Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार! आज 3721 नव्या कोरोना रुग्णांची भर तर 62 जणांचा मृत्यू
Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोनाचा (Coronavirus) हाहाकार माजला आहे. राज्यात आज 3721 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून दिवसभरात 62 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 1962 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 135796 वर पोहोचला आहे. तसेच आतापर्यंत राज्यात 67706 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोना विषाणुमुळे आतापर्यंत राज्यात 6283 जणांचा बळी गेला आहे. तर सध्या 61793 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाच्या (State Health Department) हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. (हेही वाचा -COVID19: कोरोनावर मात केल्यानंतर राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी 'या' सर्वांचे मानले आभार)

महाराष्ट्रात आज सापडलेल्या कोरोना रुग्णांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण हे मुंबई शहरातील आहेत. रविवारी मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये 1 हजार 242 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, 41 जणांचा मृत्यू झाला. तर आज दिवसभरात 1 हजार 128 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने माहिती दिली आहे.