MSRTC Workers Strike: आठशे कर्मचारी कामावर हजर; दीड हजार एसटी कर्मचारी अद्यापही संपावर
MSRTC | (Photo Credits: msrtc)

राज्यातील एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप (MSRTC Strike) अद्यापही कायम आहे. अर्थात, आंदोलनाची धार कमी झाली आहे. राज्य सरकारच्या शिष्टाईला यश येऊन आतापर्यंत संपावर असलेले जवळपास आठराशे कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. असे असले तरी अद्यापही सुमारे दीड हजारांहून अधिक कर्मचारी संपावर ठाम आहेत. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनिकरण झाल्याशिवाय आपण मागे हटणार नाही, अशी या कर्मचाऱ्यांची भूमिका आहे. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांचे भवितव्य कसे असेल याबाबत चिंता आहे.

नोव्हेंबर 2021 च्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरु केला आहे. त्यामुळे राज्यातील एसटी सेवा ठप्प आहे. अशा स्थितीत, सर्वसामान्य प्रवासी, महिला, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाची मोठी अडचण होत आहे. अनेकांना खासगी वाहन वापरावे लागत आहे. काहींना खासगी वाहतूकीचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. प्रामुख्याने ग्रामिण भागातील कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. (हेही वाचा, MSRTC Strike:ST Workers Strike: महाविकासआघाडी सरकारचा निर्णय, एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वाढले ; चालक, वाहक, लिपीक यांना किती वेतन? घ्या जाणून)

दरम्यान, राज्य सरकारने ही एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख आणि शक्य होणाऱ्या मागण्या मान्य केल्या आहेत. कर्मचाऱ्यांची पगारवाढ करुन ती वेळेत मिळेल याचाही दक्षता घेतली जाईल असे म्हटले आहे. तरीही काही कर्मचारी एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करा म्हणून अडून राहिले आहेत. राज्य सरकारने केलेली शिष्टाई कामी आल्याने संपाची नोटीस देणाऱ्या संघटनेने संपातून माघार घेतली. त्यामुळे अनेक कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. जे कर्मचारी कामावर हजर होणार नाहीत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

संधी गमावल्याने कारवाई होणारच

जे कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत त्यांच्यावर निलंबन आणि बडतर्फीची कारवाई करण्यात येत आहे. याबाबत एसटीच्या वरिष्टांना विचारले असता, राज्य सरकारने आणि एसटी प्रशासनाने संपरकीर कर्मचाऱ्यांना अनेकदा संधी दिली. त्यांना कामावर हजर राहण्यासाठी विनंती केली. मात्र तरीही हे कर्मचारी संपावर ठाम राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पडतर्फीची कारवाई करण्यात येत असल्याचे या वरिष्ठांनी म्हटले आहे.