MSRTC Recruitment 2021: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 'या' पदांसाठी भरती; येथे करा अप्लाय
ST Bus (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये (Maharashtra State Road Transport Corporation) भरती प्रक्रीयेला सुरुवात झाली आहे. यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती प्रक्रीयेत 8 वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार असून यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. 31 जुलै पासून या भरती प्रक्रीयेला सुरुवात झाली असून अर्ज करण्याची शेवटीची तारीख अद्याप जारी करण्यात आलेली नाही. वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) या पदासाठी ही भरती असणार आहे. (MSRTC चा मोठा निर्णय, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी बस लावणार अँटिमायक्रोबियकल केमिकल कोटिंग)

पद आणि जागा:

वेल्डर (Gas and Electric) या पदासाठी एकूण 3 जागा आहेत.

शैक्षणिक पात्रता:

उमेदवार 8 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच त्यास वेल्डिंगचा अनुभव असणं गरजेचं आहे.

वेतन:

7000-8415 रु. प्रति महिना

निवड प्रक्रीया:

टेस्ट आणि मुलाखतीद्वारे उमेदवाराची निवड करण्यात येईल.

वयोमर्यादा:

18-23 वर्षे

भंडारा जिल्ह्यासाठी ही भरती असून पात्र असलेल्या उमेदवारांना लेखी, तोंडी परिक्षेसाठी लागणारा सर्व अभ्यासक्रमाची आणि गुणांच्या वर्गीकरणाची माहिती त्यांना ऑनलाईन पद्धतीने देण्यात येईल.

या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://apprenticeshipindia.org/apprenticeship/opportunity-view/61027869f1c9207afc193e06 या वेबसाईटला भेट द्या. तसंच या संदर्भातील अधिक माहिती देखील तुम्हाला येथे मिळेल.

सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे. त्याचबरोबर कमी शिक्षण असूनही तुम्हाला या भरतीद्वारे नोकरीची संधी मिळत असल्याने याचा लाभ घ्या. दरम्यान, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात लवकरच ड्रायव्हर आणि कन्टंक्टर पदासाठी भरती प्रक्रीयेला सुरुवात होणार असून त्यात सुमारे 8 हजार जागा असणार आहेत.