MPSC Recruitment 2019: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 2019 साठी 555 जागांवर यंदा भरती होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही शाखेच्या पदवीधर उमेदवारांसाठी ही संधी उपलब्ध असल्याने महाराष्ट्रात असणार्या अनेक बेरोजागार तरूणांसाठी ही मोठी सुवर्णसंधी ठरणार आहे. यासाठी महाराष्ट्रभर नोकरभरतीसाठी परीक्षा देण्याची सोय खुली करण्यात आली आहे. MSRTC Mega Bharti 2019: ST मध्ये 4416 पदांसाठी भरती; जाणून घ्या कसा आणि कुठे कराल अर्ज?
कोणत्या पदांसाठी होणार भरती?
सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब): 24 जागा
राज्य कर निरीक्षक (गट-ब): 35 जागा
पोलीस उपनिरीक्षक (गट-ब): 496 जागा
शैक्षणिक पात्रता
उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असला तरीही त्याला या पदांसाठी अर्ज करता येणार आहे.
वयाची अट काय असेल?
सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक या पदासाठी अर्ज करणार्या उमेदवाराचे वय 01 मे 2019 रोजी 18 ते 38 वर्षे असण आवश्यक आहे. पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी 01 मे 2019 रोजी 19 ते 31 वर्षांची अट आहे. मागासवर्गीय गटातील उमेदवार असल्यास त्याला वयोमर्यादेमध्ये 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.
प्रवेश अर्ज फी काय असेल?
खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला 374 रूपये तर मागासवर्गीय गटातील उमेदवाराला 274 रूप्ये फी आकारण्यात आली आहे.
परीक्षेचे वेळापत्रक काय असेल?
पूर्व परीक्षा - 24 मार्च 2019
मुख्य परीक्षा संयुक्त पेपर क्र.1 - 28 जुलै 2019
मुख्य परीक्षा पेपर क्र.2 – पोलीस उपनिरीक्षक 04 ऑगस्ट 2019
मुख्य परीक्षा पेपर क्र.2 – राज्य कर निरीक्षक 11 ऑगस्ट 2019
मुख्य परीक्षा पेपर क्र.2 – सहाय्यक कक्ष अधिकारी 25 ऑगस्ट 2019
अंतिम तारीख काय असेल?
या पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 जानेवारी 2019 असेल. mahampsc.mahaonline.gov.in या वेबसाईटवर तुम्हांला ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो.
सरकारी नोकरी म्हणजे सुरक्षित नोकरी असा विचार अनेकजण करतात. तुम्हांला देखील अशाप्रकारे सरकारी नोकरी मिळवायची इच्छा असेल तर यंदा सरकारी नोकरी मिळवण्याची ही संधी सोडू नका.