एमपीएससी पूर्व परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी अॅडमीट कार्ड सोबत आणणे बंधनकारक आहे. दरम्यान परीक्षेला येताना ओळख पटवण्यासाठी आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे. तसेच फोटो व इतर मजकूर स्पष्ट दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकीत प्रत सादर करणे बंधंकारक आहे. MPSC Preparation Tips: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी परीक्षा 2020 ची तयारी करताना लक्षात ठेवा या खास टीप्स!
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 अॅडमीट कार्ड ऑनलाईन डाऊनलोड कसे कराल?
- mpsc.gov.in किंवा mahampsc.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट दया.
- तुमच्या परीक्षेच्या नावासह (PSC State Service Prelims Exam 2020) अॅडमीट कार्ड्सची लिंक पहा.
- लॉग ईन करण्यासाठी एक नवी विंडो तुमच्या स्क्रीनवर ओपन होईल त्यावर 'My Account Section' पर्यायावर क्लिक करा.
- Competitive Exam हा टॅब ओपन करून यंदाच्या वर्षाचं अॅडमीट कार्ड ओपन करा.
- त्यानंतर तुम्हांला तुमचं अॅडमीट कार्ड डाऊनलोड करण्याचा पर्याय मिळेल.
यंदा कोरोनाच्या सावटाखाली उमेदवारांना एमपीएससीची परीक्षा द्यावी लागणार असल्याने त्यासाठी आयोगाने विशेष नियमावली जारी केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना आता मास्क, फेसशिल्ड, पाण्याची बाटली, हॅन्ड सॅनिटायझर घेऊन जाण्यास परवानगी दिली जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना सोशल डिस्टंसिंग आणि कोव्हिड 19 च्या अनुषंगाने दिलेले नियम पाळणं बंधनकारक असेल.
दरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर किमान दीड तास आधी पोहचणं बंधनकारक आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना काही समस्या असल्यास आयोगाच्या हेल्पलाईन नंबर आणि ईमेल आयडीवर संपर्क साधता येणार आहे.
नव्या वेळापत्रकानुसार, राज्यसेवा पूर्व परीक्षा (MPSC Prelims Exam) 11 ऑक्टोबर 2020, दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा-22 नोव्हेंबर 2020 व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 1 नोव्हेंबर 2020 रोजी होणार आहेत.