Exam | Representational Image (Photo credits: Pixabay)

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commission) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसेवा पूर्व परीक्षा , दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा-2020 व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा- 2020 या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक पुन्हा जारी करण्यात आले आहे. आता नव्या वेळापत्रकानुसार, राज्यसेवा पूर्व परीक्षा (MPSC Prelims Exam) 11 ऑक्टोबर 2020, दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा-22 नोव्हेंबर 2020 व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 1 नोव्हेंबर 2020 रोजी होणार आहेत.

दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यातील एमपीएससीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यापूर्वीच्या 20 सप्टेंबरला होतील असे सांगण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत एप्रिल/मे2020 मध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. आता एमपीएससीने जारी केलेले राज्य सेवा पूर्व परीक्षा - 2020 बाबतचे नवे वेळापत्रक एमपीएससीच्या www.mpsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

संपूर्ण देशात नीट परीक्षा 13 सप्टेंबरला पार पडत आहे. त्या दिवशीच एमपीएससीची परीक्षा आयोजित करण्यात आली होती. दोन्ही परीक्षा एकत्र असल्याने ती 20 सप्टेंबरला होणार होती. मात्र ते देखील रद्द झालं होतं.

MPSC Exam 2020

दरम्यान महाराष्ट्रात एमपीएससीच्या मुख्य परीक्षेच्या वेळापत्रकाच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. त्या लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. दरम्यान पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांच्या गुणांची बेरीज करून अंतिम निकाल आणि सिलेक्शन झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाते. काही दिवसांपूर्वी 2019 सालच्या परीक्षांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत ऑनलाईन अ‍ॅडमीट कार्ड्स देखील उपलब्ध होतील.