MPSC 2020 पूर्वपरीक्षा अचानक रद्द झाल्याने पुण्यात विद्यार्थी आक्रमक; आमदार रोहित पवार, सत्यजित तांबे यांच्यासह अनेकांची कोरोना प्रतिबंधक नियम  पाळत परीक्षा घेण्याची सरकारकडे मागणी
MPSC aspirants Protest in Pune | Photo Credits: Twitter/ ANI

महाराष्ट्रामध्ये कोरोना संकट (Covid 19 Pandemic) आणि मराठा आरक्षण (Maratha Reservation)  स्थगिती यांच्यामुळे मागील वर्षभरात अनेकदा एमपीएससी 2020 पूर्व परीक्षा (MPSC 2020 Prelims) रद्द झाली आहे. आजही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपलेली एमपीएससीची परीक्षा अचानक रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचा उद्रेक पहायला मिळाला आहे. पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणार्‍या अनेकांनी रस्त्यावर उतरून आपला निषेध नोंदवला आहे. यावेळेस भाजपचे गोपिचंद पडळकर देखील विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरून चक्काजाम करताना दिसले. नक्की वाचा: MPSC Exams Updates: 14 मार्चला होणारी एमपीएससी पूर्व परीक्षा कोविड 19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा लांबणीवर; नवे वेळापत्रक लवकरच.

दरम्यान अचानक Maharashtra Public Service Commission ने परीक्षा लांबणीवर टाकल्याचे जाहीर करताच विद्यार्थ्यांनी आपला निषेध नोंदवताना इतर कार्यक्रमांच्या वेळेस, ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या वेळेस किंवा केंद्रीय आयोगाच्या परीक्षेच्या वेळेस कोरोना आड येत नाही. हा केवळ एमपीएससी स्पर्धेच्या वेळीच आडवा कसा येतो? अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केला आहेत.

सत्यजित तांबे  

रोहित पवार  

विजय वडेट्टीवार 

आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे प्रधान सचिव याबाबत चर्चा करत आहेत. युवा कॉंग्रेसचे सत्यजित तांबे, एनसीपी आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहत एमपीएसीने  कोरोना संकटात पुरेशी खबरदारी घेत परीक्षा घेण्याची विनंती सरकारकडे केली आहे. तर मदत व पुर्नविकास मंत्री विजय वड्डेटीवार यांनी राज्य सरकारने MPSC परीक्षेबाबत आज घेतलेल्या निर्णयाला पुन्हा वेगाने वाढत असलेले कोरोना संकट कारणीभूत आहे .राज्यातील भाजप नेत्यांनी या संकटात तेल घालून विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज पसरवू नये.असे आवाहन केले आहे.

यंदाच्या वर्षी 2.5 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे. विविध विभागांमध्ये 200 पदांवर भरती होणार आहे. 23 डिसेंबरला या परीक्षेचं नोटिफिकेशन जारी झालं आहे तर 13 जानेवारी 2020 पर्यंत परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुभा होती. काही दिवसांपूर्वीच अ‍ॅडमीट कार्ड्स जारी करत विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणामध्ये परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले होते.