Sambhaji Raje Chhatrapati | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्रात मराठा आरक्षण अवैध ठरवल्यानंतर त्या समाजातील असंतोष समजून घेत खासदार संभाजी छत्रपती यांनी महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. तसेच ते विविध राजकीय नेत्यांची भेट घेत आहेत. या भेटीगाठींमध्ये संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. आज ही भेट होणार आहेत. त्यामुळे या भेटीत नेमकं काय होणार? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबरीने आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार आहेत. दोन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच राज्यात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरी मध्ये आरक्षण दएण्यात आले होते. दरम्यान काल संभाजी राजेंनी एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन मराठा आरक्षण प्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येणं गरजेचे आहे. त्यासाठी पवारांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती देखील करण्यात आली. नंतर संभाजीराजे मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यादेखील भेटीला गेले होते.

संभाजीराजे आज सर्वपक्षीय नेत्यांना भेटल्यानंतर त्यांच्याशी काय बोलणं झालं आणि स्वतः राजेंची भूमिका काय आहे? याबाबतही जाहीर भुमिका मांडण्याची शक्यता आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार 12 च्या विरोधी पक्षांसोबत तर 1 च्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत त्यांची बैठक आयोजित आहे.

देशातील सध्याची कोवीड परिस्थिती पाहता संभाजी राजेंनी मराठा समाजाला संयम बाळगण्याचं आवाहन केले आहे. आंदोलनं किंवा उद्रेक होणार नाही याची काळजी घेण्याची भूमिका त्यांनी सातत्याने मांडली आहे.