खासदार संभाजीराजे | Photo Credits: Twitter/ ANI

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात मराठा आरक्षण रद्द बातल ठरवल्यानंतर या समाजात पुन्हा संताप, अस्वस्थता वाढली आहे. दरम्यान राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्र सरकारच्या गोटात फेकून त्यांनी मदत करावी असं आवाहन केलेले असताना आता खासदार संभाजीराजे (Sambhaji Chhatrapati) या प्रश्नी पुढे आले आहेत. मागील काही दिवस महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये दौरा करून आज त्यांनी एनसीपी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. मुंबईत सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी त्यांची 13-15 मिनिटांची भेट झाली आणि त्यावेळेस त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं असेल तर राज्यातील सार्‍या नेत्यांनी एकत्र येणं गरजेचे आहे आणि त्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा असं म्हटलं आहे.

दरम्यान शरद पवारांसोबतची बैठक सकारात्मक झाली आहे. संभाजी राजेंनी शरद पवारांना मराठा समाज आरक्षण प्रश्नी देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणं गरजेचे आहे तर त्यांना एकत्र आणण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती केली आहे. सोबतच मराठा आरक्षण प्रकरणी महाराष्ट्र सरकारच्या हातात केंद्राकडे न जाता कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या पर्यायांचाही शरद पवारांसोबतच्या बैठकीत विचार झाल्याचं सांगितले आहे. Maratha Reservation: मराठा आरक्षण प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळ दिली नाही; खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा नाराजीचा सूर, समाजाला शांततेचे अवाहन.

ANI Tweet

संभाजी राजे उद्या मुंबई मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार आहेत. राज्यात मराठा आरक्षण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काळात झाला आहे. पण आता कोर्टाने ते रद्द केले आहे. दरम्यान कोविड परिस्थिती पाहता संभाजीराजेंनी मराठा समाजाला संयम बाळगण्याचं आवाहन केले आहे. मोर्चे, उद्रेक टाळून आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी मराठा समाजाला वारंवार केले आहे.