Maratha Reservation: मराठा आरक्षण प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळ दिली नाही; खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा नाराजीचा सूर, समाजाला शांततेचे अवाहन
Sambhaji Raje Chhatrapati | (Photo Credits: Facebook)

मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेला. हा निकाल आपल्या बाजूने कसा आणता येईल यासाठी काय करावे लागेल यासाठी चर्चा आणि विचारविनिमय करुन मार्ग काढता येईल. परंतू, या प्रश्नावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनाही आम्ही चार वेळा वेळ मागितली परंतू त्यांनी ती दिली नाही, अशी नाराजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, मी सामंजस्याची भूमिका घेतली म्हणून काही लोक टीमटीम करत आहेत. परंतू, आगोदर आपली जीवन मरणाची लढाई. हक्क अधिकार त्यानंतर. त्यामुळे येत्या 27 तारखेपर्यंत समाजबांधवांनी शांत राहावे, असे अवाहनही संभाजीराजे यांनी व्यक्त केले.

राज्याचे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांना येत्या 27 तारखेला आपण मराठा आरक्षण प्रकरणी भेटणार आहोत. या वेळी त्यांच्यासमोर समाजाची भूमिका मांडणार आहोत. या भेटीनंतर आपलीही पुढील भूमिका ठरेल असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंर काहीशी सामंजस्याची भूमिका घेतल्यावरुन होत असलेल्या टीकेला खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काहीसे आक्रमक प्रत्युत्तर दिले. आंदोलन केव्हा आणि कस करायचे हे कोणी आम्हाला सांगण्याची गरज नाही. मी शांत आहे, संयमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांचे विचार आणि संस्कार आमच्यात भिनलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही अनेक वेळा तह केले आहेत. सद्याची एकूणच परिस्थीती पाहता आगोदर जीव वाचविण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर आपले हक्क अधिकार यांबाबत लढण्याची. त्यामुळे आरक्षणाच्या बाबतीत मी राज्यभर दौरे करत आहे. तज्ज्ञांसोबत सर्वंकश चर्चा केल्यानंतरच पुढील भमिका ठरवली जाईल, असेही खासदार संभाजीराजे छत्रपती या वेळी म्हणाले. (हेही वाचा, मराठा आरक्षणाबाबत आघाडी सरकार कुठे कमी पडलं, याची पोलखोल करण्यासाठी लवकरच कायदेतज्ज्ञांची समिती स्थापन करणार- चंद्रकांत पाटील)

संभाजीराजे छत्रपती ट्विट

दरम्यान, सारथी या संस्थेला राजर्षी शाहू महाराज यांचे नाव दिले आहे. परंतू, प्रत्यक्षात तिथे काहीच काम होत नाही, असा आरोपही संभाजीराजे छत्रपती यांनी केला. तसेच, या विषयातही मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली.