गाईच्या पाठीवर हात फिरवल्यामुळे नकारात्मक विचार निघून जातात; काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा अजब दावा
Congress Leader Yashomati Thakur (PC- Facebook)

काँग्रेस नेत्या आणि महिला आणि बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर (Congress Leader Yashomati Thakur) पुन्हा एकदा नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. 'गाईच्या पाठीवर हात फिरवल्यामुळे नकारात्मक विचार निघून जातात,' असा अजब दावा त्यांनी केला आहे. मागील आठवड्यातदेखील यशोमती ठाकूर यांनी वादग्रस्त विधान (Contravercial Statement) केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली होती.

यशोमती ठाकूर या आपल्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखल्या जातात. आपण आपली संस्कृती विसरत आहोत. गाईच्या दर्शनाने तसेच तिच्या पाठीवर हात फिरवल्यामुळे आपल्यातील नकारात्मक विचार निघून जातात. त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधी पक्षांकडून यशोमती ठाकूर अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, त्यांच्या या विधानाला राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी असहमती दाखवली आहे. (हेही वाचा - MNS New Flag: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्याला विरोध; आर आर पाटील फाऊंडेशनने लिहले पत्र)

मागील आठवड्यात यशोमती ठाकूर यांनी 'आम्ही आताच तर शपथ घेतली आहे, अजून खिसे गरम व्हायचेत,' असं जाहीर विधान केलं होतं. वाशीम जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी आल्या असताना त्यांनी हे विधान केलं होतं. भाजप नेत्यांचे खिसे यापूर्वीच भरभक्कम भरले आहेत. ते रिकामे करण्यासाठी जर दारात लक्ष्मी येत असेल, तर तिला नकार देऊ नका, असं आवाहनही यशोमती ठाकूर यांनी त्यावेळी केलं होतं.