Toyota Kirloskar Motor MOU | X

टोयाटो किर्लोस्कर मोटार (Toyota Kirloskar Motor) यांनी आज महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government)  सोबत सामंजस्य करार केला आहे. छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar) भागामध्ये त्यांच्याकडून greenfield manufacturing facility उभारली जाणार आहे. कर्नाटकमध्ये मुख्यालय असलेल्या, टोयाटो किर्लोस्कर मोटार कडे सध्या बिदाडी येथे दोन युनिट्स आणि 3.42 लाख युनिट्सची एकत्रित वार्षिक क्षमता असलेले उत्पादन सेटअप आहे.

सामंजस्य करारानुसार, TKM नवीन उत्पादन सुविधा स्थापन करण्यासाठी महत्त्वपूर्ण गुंतवणुकीचा विचार करत आहे ज्यामुळे कंपनीचे हरित तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित असणार आहे. प्रस्तावित गुंतवणूक, एकदा अंतिम झाल्यानंतर, अनेक वर्षांच्या कालावधीत केली जाण्याची आशा आहे. छत्रपती संभाजीनगर येथे या प्रकल्पातून इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार बनवल्या जाणार आहेत. यासाठी २० हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार असून सुमारे 8 हजार थेट आणि अप्रत्यक्ष 8 हजार अशी 16 हजार रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पातून वर्षाला 4 लाख कार्सची निर्मिती होणे अपेक्षित आहे.

2023 मध्ये टोयोटाने अंदाजे 3,300 कोटी च्या नव्या गुंतवणुकीची घोषणा केली होती. बिदाडी येथील तिसऱ्या प्लांटसाठी ही घोषणा होती. या विस्तारामुळे कंपनीची उत्पादन क्षमता वार्षिक 1 लाख युनिट्सने वाढेल. 2026 मध्ये या तिसऱ्या प्लांटचा विस्तार मुख्य प्रवाहात आल्याने, बिदाडी येथील वार्षिक उत्पादन क्षमता 4.42 लाख युनिट्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.