Kill | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

Dispute On Tasty Food In Thane : ठाणे जिल्ह्यातील एका 55 वर्षीय महिलेला तिच्या मुलासोबत झालेल्या वादात आपला जीव गमवावा लागला आहे. ठाण्यातील मुरबाड तालुक्यातील वेळू गावात ही घटना रविवारी (26 नोव्हेंबर) सायंकाळी घडली. आई आणि मुलामध्ये घरगुती वाद वारंवार होत असत. मात्र, ही घटना घडली त्या दिवशी चविष्ट जेवण न दिल्याने संतापलेल्या मुलाने आईवर विळ्याने हल्ला केला. ज्यामध्ये आईचा मृत्यू झाला. घटना घडल्यावर आपण काय करुन बसलो याची जाणीव झाल्यानंतर आरोपीने झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोज घेतला. दरम्यान, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ठाणे ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षाने आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०२ (हत्या) अन्वये गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे येथील 55 वर्षीय मुलगा आणि त्याच्या आईमध्ये रुचकर जेवणावरुन वाद झाला. आईने रुचकर जेवण बनवले नाही म्हणून आरोपी चिडला होता. आरोपी हा सदर महिलेचा मुलगा आहे. आरोपी आणि आईमध्ये वाद होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. महिला आणि तिच्या मुलामध्ये घरगुती कारणावरून वारंवार भांडणे होत असत. दरम्यान, रविवारी, आरोपीचे त्याच्या आईशी पुन्हा भांडण झाले. त्याने तक्रार केली की तिने त्याला चवदार अन्न शिजवले नाही आणि त्यातूनच वाद सुरु झाला. आरोपीने आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. (हेही वाचा, Palghar: पालघर जिल्ह्यात मुलाने केली 50 वर्षीय आईची हत्या; आरोपीला अटक)

आरोपी इतका चिडला होता की, त्याने रागाच्या भरात आपल्या आईच्या मानेवर विळ्याने वार केला. घाव वर्मी लागल्याने ती जागीच कोसळली आणि मरण पावली, असेही पोलिसांनी सांगितले. शेजारच्या काही लोकांनी पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेनंतर आरोपीने झोपेच्या गोळ्यांचे ओव्हरडोज घेतल्याचा आरोप आहे. त्याला नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले असून अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३०२ (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

एक्स पोस्ट

दरम्यान, घडल्या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. परिसरातील नागरिकांनी हत्येच्या विविध घटना ऐकल्या पाहिल्या होत्या. मात्र, स्वादिष्ट जेवण बनवले नाही एवढ्या कारणावरुन पोच्या मुलानेच जन्मदात्रीची हत्या करावी ही घटना अतिशय धक्कादायक आहे. परिणामी घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे. घटना ज्या ठिकाणी घडली त्या परिसरातील आजूबाजूच्या घरांतील कुटुंबामध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.