Flood | Representational Image (Photo Credits: Pixabay)

देशभरात मुसळधार पावसाने (Monsoon Rain Updates) पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. प्रामुख्याने उत्तराखंड (Uttarakhand), ओडीशा (Odisha), हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) अशा राज्यांना पावसाने झोडपून काढल्याने अनेक ठिकाणी महापूर (Floods) तर काही ठिकाणी पूरसदृश्य स्थिती (Flood-Like Conditions) निर्माण झाली आहे. जम्मू कश्मीर राज्यातील पंजाल पर्वतरांगांमधील वरच्या भागात मुसळधार पाऊस झाल्याने राजौरी जिल्ह्यात दरहाली नदी दुथडी भरुन वाहते आहे. ज्यामुळे आजूबाजूच्या परिसरात पूर सदृश्य स्थित निर्माण झाली आहे. उत्तराखंड येथेही पावसाची संततधार कायम राहिल्याने ऋषिकेश येथे गंगा नदीचा प्रवाह वेगवान बनला आहे. आजूबाजूचा परिसर पाण्याखाली गेला आहे.

हिमाचल प्रदेशात 21 जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेश राज्यात ढगफुटी झाल्याचा मोठा फटका स्थनिकांना बसला. अचानक कोसळलेला पाऊस आणि वाढलेले पाणी यांमुळे यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झाली. त्यातच अनेक ठिकाणी भूस्खलन घडले त्यामुळे संपर्क यंत्रणाही फोल ठरली. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार महापूराचा फटका बसून 21 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण बेपत्ता आहेत. पाठिमागच्या 24 तासापासून हिमाचल प्रदेशात पाऊस संततधार कोसळत आहे. हवामान विभागाने हिमाचल प्रदेशातील कांगडा, चंबा, बिलासपूर, सिरमौर आणि मंडी या पाच जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. (हेही वाचा, Maharashtra Rains: कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार तर विदर्भातही पावसाचा जोर कायम)

ट्विट

उत्तराखंडमध्ये ढगफुटी

उत्तराखंड राज्यात शनिवारी सकाळी संततधार पावसासोबतच झालेल्या ढगफुटीच्या घटनेमुळे चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 10 लोक बेपत्ता झाले आहेत. राज्यातील बहुतांश नद्यांना पूर आला आहे. ज्यामुळे अनक पूल पाण्याखाली गेले आहेत. टीहरी जिल्ह्यातील ग्वाद गावात मुसळधार पावसामुळे दोन घरं कोसळली ज्यात सात लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले.

ट्विट

ओडिशा राज्यात महानदिला पूर

ओडिशा राज्यातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. ज्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये नद्या, नाले ओसंडून वाहात आहेत. त्यामुळे ओडिशातील नागरिकांसमो मोठे संकट उभे ठाकले आहे. प्रामुख्याने महानदीला मोठा पूर आला आहे. काही लोकांना या पूराचेही आकर्षण वाटतेआहे. त्यामुळे पुराचे पाणी पाहायला लोक गर्दी करताना दिसत आहेत. ओडिशातील कट जिल्ह्यातील मुंडाली, नारज आणि जोबरा आदी ठिकाणी अनेक लोक गर्दी करु लागले आहेत.

ट्विट

दरम्यान, हवामान विभागाने महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी मुसळधार, हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा दिला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी दमदार पाऊस कोसळताना दिसतो आहे.