
यंदा वेळेआधीच मान्सून दाखल झाला असल्याने सगळ्यांची धांदल उडाली आहे. मुंबई मध्ये मान्सून पूर्व सरी बरसण्यास सुरूवात झाली आहे. अशात आता मान्सूनचे प्रवाह बळकट झाल्याने रविवार 25 मे पर्यंत केरळ मध्ये मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. मान्सूनचा दरवर्षीचा प्रवास पाहता यंदा 5 दिवस आधी म्हणजे 13 मे दिवशी मॉन्सून दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या मंगळवार 20 मे 2025 च्या अंदाजानुसार, पुढील 4-5 दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होऊ शकतो असा अंदाज वर्तवला आहे. केरळमध्ये दरवर्षी 1 जूनच्या आसपास मान्सून दाखल होतो.
IMD च्या अंदाजानुसार, यंदाच्या मान्सून हंगामात सरासरी पेक्षा जास्त पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तवला आहे. यावेळी एल निनो परिस्थिती येण्याची शक्यता नाकारण्यात आली आहे. एल निनो भारतीय उपमहाद्वीपात सामान्यपेक्षा कमी पावसाला कारणीभूत ठरतो. यंदा ला निना चा प्रभाव पावसासाठी पोषक ठरू शकतो, ज्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मान्सून केरळमध्ये लवकर दाखल झाल्यास खरीप हंगामाला फायदा होणार आहे. नक्की वाचा: Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज.
महाराष्ट्र हवामान अंदाज
Weather Update pic.twitter.com/blEt4e4ElW
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 20, 2025
2009 नंतरचा सर्वात लवकर दाखल होणारा यंदाचा मान्सून असेल. सध्या मान्सूनपूर्व पावसामुळे धांदल उडाली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.