Monsoon 2020 Updates: मुंबई मध्ये पुढील 48 तास मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता - हवामान खात्याचा अंदाज
Mumbai Rains| Image Used For Representative Purpose | Photo Credits: unsplash.com

मुंबईमध्ये यंदा जून 11 ला मान्सूनचं आगमन झालं आहे. यानंतर मुंबई सह राज्यभरात हळूहळू शिरकाव करत मान्सूनने संपूर्ण राज्य व्यापलं आहे. दरम्यान आता हळूहळू राज्यात पावसाची दमदार बॅटिंग सुरू झाली आहे. मुंबई शहरात मागील 24 तासामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. तर आज (23 जून) आणि उद्या  देखील पावसाचा जोर तसाच राहण्याची शक्यता मुंबई हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, यंदा 1 जून पासून राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस नोंदवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तर नागपूर, विदर्भ भागामध्ये काही जोरदार सरी बरसण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. काल पासून नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल नेहमीच्या गति पेक्षा जास्त असल्याचं दिसून आले आहे. आता ही मान्सूनची आगेकूच उत्तर भारताच्या दिशेने गतिमान पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे अधून मधून कोकण किनारपट्टीलाही पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

K S Hosalikar Tweet

दरम्यान यंदा भारतीय हवामान खात्याने देशभरात सरासरी पाऊस बरसेल अशी माहिती दिली आहे. ही शेतकर्‍यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनला सुरूवात झाल्याने आता शेतीच्या कामांनाही वेग आला आहे. भाताची पेरणी सुरू झाली आहे.