Anil Deshmukh | (Photo Credit : ANI/Twitter)

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या जामीन अर्जाबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने देशमुख यांना 'मनी लाँड्रिंग' (Money Laundering Case) प्रकरणात जामीन देण्यास आव्हान देणारी अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली.

न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड (Justice DY Chandrachud) यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने अनिल देशमुख यांना दिलासा दिला आहे. पीएमएलए प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यामुळे अनिल देशमुख यांचा जामीनाचा मार्ग बऱ्यापैकी मोकळा झाल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा, Anil Deshmukh यांना खाजगी रूग्णालयात उपचार घेण्यास Special PMLA Court ची परवानगी)

ट्विट

दरम्यान, या आधी मुंबईतील मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) विशेष न्यायालयाने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्या हृदयविकाराची प्रक्रिया करण्यास( मंगळवारी) परवानगी दिली. देशमुख यांच्या आजारासंदर्भातील वैद्यकीय अहवालाबाबत आर्थर रोड कारागृह प्रशासनाने ई-मेल पाठवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.