Money Laundering Case:  टॉप्स सिक्युरिटी प्रकरणात ED कडून MMRDA आयुक्त R A Rajeev यांना समन्स
MMRDA (संग्रहित-संपादित प्रतिमा)

टॉप्स सिक्युरिटी मधील आर्थिक घोटाळ्याची सध्या ईडी कडून चौकशी सुरू आहे. दरम्यान यामध्ये आता एमएमआरडीए आयुक्त R A Rajeeiv यांना समन्स देण्यात आला आहे. दरम्यान MMRDA ने याबाबत ट्वीटर वरून खुलासा करताना, ' 2014-17 मधील टॉप्स सिक्युरिटीच्या टेंडर बाबत ईडीने MMRDA Metropolitan Commissioner ला समन्स पाठवला आहे. त्या काळात Urvinder Singh Madan यांच्याकडे हे पद होते आता ते निवृत्त झाले आहेत त्यांच्याजागी सध्याचे आयुक्त R.A.Rajeev ईडी कार्यालयात जातील.

दरम्यान टॉप्स सिक्युरिटी मधील कथित आर्थिक गैरव्यवहारामध्ये शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग सरनाईक यांची चौकशी यापूर्वी झाली आहे. तर या प्रकरणात ईडीने दोघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार अमित चांदोळे यांचा समावेश देखील होता. (नक्की वाचा: प्रताप सरनाईक यांचे मित्र अमित चांदोळे यांना ED कडून अटक; टॉप्स सिक्युरिटी समुहाच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर कारवाई).

एमएमआरडीए ट्वीट

काय आहे प्रकरण

टॉप्स सिक्युरिटी कडून एमएमआरडीए ला 175 कोटी च्या कंत्राटासाठी 7 कोटी लाच देण्यात आली असे टॉप्स सिक्युरिटीचे माजी कर्मचारी रमेश अय्यर यांनी ऑक्टोबर महिन्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी FIR दाखल केला आहे. करण्यात आलेल्या दाव्यानुसार, टॉप्स सिक्युरिटीकडून 100 पैकी फक्त 70 टक्के गार्ड्स वापरले जात असे. 30 टक्के गार्ड्सचा वापर केला जात नसून त्यांची रक्कम लाच म्हणून दिली जात होती. सध्या या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे.