‘टॉप्स सिक्युरिटी’ (Tops Security) समुहाचे भागीदार आणि प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांचे जवळचे मित्र अमित चांदोळे (Amit Chandole) यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून (Enforcement Directorate) अटक करण्यात आली आहे. काल शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने छापे टाकले होते. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. दरम्यान, ‘टॉप्स सिक्युरिटी’ या समूहाविरोधातील आर्थिक गैरव्यवहारासंबंधित अधिक माहिती उघडकीस आणण्याच्या दृष्टीकोनातून ईडीने चांदोळे यांना अटक केली आहे. तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर अटकेची कारवाई करण्यात आली. (ED Eummons Pratap Sarnaik: अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना चौकशीसाठी बोलावले)
या प्रकरणी प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांच्या मुलगा विहंग सरनाईक याचीही चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, परदेशातून परतलेले प्रताप सरनाईक क्वारंटाईन आहेत. तर विहंग यांची पत्नी रुग्णालयात दाखल असल्याने त्यांना चौकशीसाठी हजर राहणे शक्य नसल्याचे त्यांनी पत्रद्वारे ईडी अधिकाऱ्यांना कळवले आहे. मात्र ईडीच्या चौकशीला सहकार्य करणार असल्याचेही त्यात म्हटलं आहे. (Sharad Pawar Slams Centre: केंद्रात असणाऱ्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे; प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाईवर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया)
ANI Tweet:
Mumbai: Enforcement Directorate has arrested one Amit Chandole in an alleged money laundering case related to private company Tops Security
— ANI (@ANI) November 26, 2020
प्रताप सरनाईक यांच्या घर व कार्यालयावर ईडी कडून टाकण्यात आलेल्या छाप्यानंतर महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रात असलेल्या सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचं म्हटलं आहे. तसंच महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याने सत्तेच येण्याची आशा संपुष्टात आली आहे. त्यामुळे महाष्ट्रात जे काही सुरु आहे ते विरोधकांच्या नैराश्याचं प्रतिक असल्याचेही ते म्हणाले.