CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

Mohan Delkar Suicide Case: दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी 22 फेब्रुवारीला मुंबईतील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. त्यांच्या मृतदेहाजवळ एक सुसाइड नोट सुद्धा मिळाली होती आणि त्यात काही जणांची नावे ही लिहिण्यात आली. अशातच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी आता विविध प्रश्न उपस्थितीत केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, खासदार डेलकर यांच्या सुसाइड नोट मध्ये ज्यांची नावे आहेत ते नेते राजीनामा देतील का?(MP Mohanbhai Delkar Found Dead: खासदार मोहनभाई डेलकर यांचा मृत्यू; मुंबई येथे संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह)

पुढे उद्धव ठाकरे यांनी असे म्हटले की, डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी कोणची रस्त्यावर उतरुन आंदोलन करत नाही आहे. त्याचसोबत जेव्हा मुंबई पोलीस गुजरात मध्ये तपासासाठी जातील त्यावेळी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी सहकार्य करावे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Tweet:

त्याचसोबत काँग्रेसचे प्रवक्ता पवन खेडा यांनी सुद्धा डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी तपास करण्यात यावा अशी मागणी केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, डेलकर यांनी 16 पानी सुसाइड नोट सोडली असून ज्यामध्ये दादरा नगर हवेली मधील प्रशासक प्रफुल्ल खोडा पटेल यांच्यावर आरोप लावला आहे.(Mohan Delkar Suicide Case Update: दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस चौकशी करणार- अनिल देशमुख)

दरम्यान, 2019 मध्ये निवडणूकीवेळी मोहन डेलकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले होते आणि जिंकले सुद्धा होते. त्यानंतर डेलकर यांना त्रास देण्यास सुरुवात झाली होती असे ही खेडा यांनी म्हटले आहे. तर डेलकर यांनी मुंबईत स्थित असलेल्या एका हॉटेलमध्ये पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून तपास केला जात आहे.