दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर (Mohan Delkar Suicide Case) यांनी 22 फेब्रुवारी रोजी मुंबईतील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येच्या ठिकाणी 16 पानांचे पत्र सापडल्यामुळे या आत्महत्येबाबत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यात त्यांना होणारा त्रास आणि मिळणारी वागणूक या सर्व गोष्टी नमूद केल्या होत्या. हे सर्व पाहता या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिस चौकशी करणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी देली आहे.
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी या आत्महत्येबाबत अनेक मुद्दे अनिल देशमुख यांनी उपस्थित केले.हेदेखील वाचा- MP Mohanbhai Delkar Found Dead: खासदार मोहनभाई डेलकर यांचा मृत्यू; मुंबई येथे संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
'जे सात वेळा खासदार म्हणून निवडून आले, अशा व्यक्तीने आत्महत्या केल्यानं प्रश्नचिन्ह निर्माण होते. डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली यामागे काय कारण असेल? तसेच त्यांनी ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावं दिली आहेत. त्यापैकी कोणी जबाबदार आहे का? दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल हे जबाबदार आहेत का? त्यांच्या दबावाखाली आत्महता केली का? याचा आम्ही तपास करु,' असं अनिल देशमुख म्हणाले. त्यामुळे मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करुन जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करु, असं गृहमंत्री म्हणाले.
मोहन डेलकर यांचा राजकीय इतिहास पाहता ते पक्ष बदलण्या वाक्बर होते. त्यांनी अनेक पक्षांत प्रवेश केला. मात्र, कोणत्याच पक्षात ते स्थिर होऊ शकले नाहीत असे त्यांच्या राजकीय कारकीर्दीवरुन लक्षात येते. असे असले तरी त्यांना राजकीय यश मात्र मिळत गेले. ते अनेक निवडणुका जिंकले. 2004 मध्ये त्यांनी भारतीय नवशक्ति पार्टी , फेब्रुवारी 2009 मध्ये काँग्रेस, तर लोकसभा निवडणूक 2019 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. नवशक्ती पार्टी, काँग्रेस आणि आता अपक्ष असे ते निवडून आले. गेल्या वर्षी (2020) त्यांनी जनता दल यूनायटेड पक्षात प्रवेश केला होता.