कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांसाठी 'मोदी एक्स्प्रेस' (Modi Express) धावणार असल्याची घोषणा भाजपा आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी केली आहे. व्हिडिओ शेअर करत त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. मोदी एक्स्प्रेस दादर वरुन कणकवली, वैभववाडी आणि सावंतवाडी पर्यंत धावणार असून 1800 नागरिकांसाठी ही ट्रेन असेल. विशेष म्हणजे ही ट्रेन मोफत असणार आहे. (पश्चिम रेल्वेकडून गणेशोत्सवासाठी चालवल्या जाणार 5 स्पेशल रेल्वेगाड्या; येत्या 16 ऑगस्टपासून तिकिट बुकिंगला होणार सुरुवात, येथे पहा ट्रेनची यादी)
दरवर्षी गणेशोत्सवासाठी आम्ही बसेस सोडतो. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणे साहेबांना केंद्रीय मंत्रीमंडळात मानाचं स्थान देऊन कोकणाला आशीर्वाद दिला आहे. म्हणून त्यांचे आभार मानण्यासाठी यावर्षी मोदी एक्स्प्रेस गणेश चतुर्थीसाठी मोदी एक्स्प्रेस सोडत आहोत, असे भाजप आमदार नितेश राणे यांनी सांगितले. ही ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरुन सुटेल. तसंच यात एकवेळचं जेवणाची सोय असेल. (Ganpati Special ST Bus: गणेशोत्सवासाठी 2200 ST Buses ची सोय; 'या' तारखेपासून बुकींगला सुरुवात)
नितेश राणे ट्विट:
Ganpati Bappa Moriya!! pic.twitter.com/bpmTJUI1vQ
— nitesh rane (@NiteshNRane) August 22, 2021
27 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान तुम्ही या गाडीचे बुकिंग करु शकाल. यासाठी प्रवाशांना नितेश राणे मतदारसंघातील मंडळ अध्यक्षांचे क्रमांक देण्यात आले आहेत. देवगडमधील संतोष किंजवडेकर आणि अमोल तेली, वैभववाडीसाठी नासिरभाई काजी आणि कणकवलीसाठी मिलिंद मिस्त्री व संतोष कानडे यांना फोन करुन सीट बुकिंग करायची आहे. दरम्यान, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष ट्रेन्स आणि बसेसची सोयी करण्यात आली आहे.