लॉकडाउनच्या काळात संपूर्ण व्यवहारांना बंदी असल्याने वीजबिले पाठवण्यात आली नव्हती. जूननंतर वीजबिले देण्यास सुरूवात झाली असून, वीजबिलाची रक्कम बघून अनेकांना धक्काच बसला आहे. कोरोनाच्या काळात हाताला काम नसताना देखील नागरिकांना वाढीव वीजबिल मिळाली आहेत. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. याच मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. "राज्य सरकारने महावितरण आणि बेस्ट सारख्या सरकारी आस्थापनांना तात्काळ आदेश द्यावेत आणि खाजगी वीज कंपन्यांना देखील कडक शब्दांत समज द्यायला हवी, अन्यथा या खाजगी वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल", असे राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लिहलेल्या पत्रात नमूद केले आहे.
राज्याला महसुलाची अडचण आहे, हे सर्वांना मान्यच आहे पण म्हणून जनतेच्या खिशाला त्यासाठी भोक पाडणे हा मार्गच असू शकत नाही. म्हणूनच या विषयात मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ लक्ष घालावं आणि या वीजबिलात तात्काळ सूट द्यावी, तसंच ही सूट कोणत्याही प्रकाराने भविष्यात वसूल करायचा प्रयत्न करू नये. राज्य सरकारने महावितरण आणि बेस्ट सारख्या सरकारी आस्थापनांना तात्काळ आदेश द्यावेत आणि खाजगी वीज कंपन्यांना देखील कडक शब्दांत समज द्यायला हवी अन्यथा ह्या खाजगी वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल, असे राज ठाकरे पत्रातून म्हणाले आहेत. हे देखील वाचा- भविष्यात भाजप- शिवसेना एकत्र आली तरी, निवडणुका मात्र वेगवेगळ्या लढणार- चंद्रकांत पाटील
राज ठाकरे यांचे ट्वीट-
अव्वाच्यासवा वीज बील आकारणीला तात्काळ चाप बसायलाच हवा. #वीजआकारणी #महावितरण #टाळेबंदी #कोरोनामहासाथ #MahaVitaran #electricitybill #Lockdown #CoronaCrisis@CMOMaharashtra pic.twitter.com/IFnxkBOZLw
— Raj Thackeray (@RajThackeray) July 28, 2020
वाढीव वीजबिला विरोधात मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी ठाण्यातील लोकमान्यनगर येथील महावितरण कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली होती. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी कार्यलयाच्या प्रवेश द्वारालाच टाळे ठोकून गेटबाहेर महावितरण घोषणाबाजी केली होती. लॉकडाऊनच्या काळामध्ये वीजबिल देण्यात आली आहेत. ज्यामध्ये आकार आणि प्रत्येक युनिटमागे आकार वाढविण्यात आल्यामुळे ही वाढीव बिले आली असल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी त्यावेळी केला आहे.