Raj Thackeray And Nishikant Kamat (Photo Credit: Wikimedia/ Instaram)

प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता निशिकांत कामत (Nishikant Kamat) याच वयाच्या 50 व्या वर्षी निधन झाले आहे. हैदराबादच्या एआयजी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज उपचारादरम्यान निशिकांत यांची मृत्यूशी झूंज अखेर संपली आहे. निशिकांत यांच्या मृत्यूने संपूर्ण सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, त्यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्वीटरच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. तसेच राज ठाकरे आपल्या पोस्टद्वारे निशिकांत कामत यांचा सिनेसृष्टीतील प्रवास थोडक्यात सांगितला आहे.

"निशिकांत कामतच्या निधानाने आपण एक उमदा दिर्गदर्शक गमावला आहे. निशिकांतचे सिनेमावर मनापासून प्रेम होते. दृश्यस्वरूपात सांगायची गोष्ट म्हणजे सिनेमा...हे मराातील ज्या अगदी बोटावर मोजता येतील इतक्या मोजक्याच दिग्दर्शकांना कळले होते आणि ज्यांना स्वत:ची गोष्ट ताकदीने दृश्य स्वरूपात मांडता यायची त्यात निशिकांत होता. प्रत्येक दशकाचा एक कल्ट सिनेमा असतो तसा 'डोंबिवली फास्ट' हा मागच्या दशकातील मराठीतील कल्ट सिनेमा होता. राजकीय- सामाजिक स्थित्यंतरांमध्ये सामान्य माणूस घुसमटत असतो. त्यातून त्याचा स्वत:शीच संघर्ष सुरु होतो. याचे भान निशिकांतमधल्या दिग्दर्शकाला होत. सामान्य माणसांच्या आक्रोशाचा मराठीतील डोंबिवली फास्टमधून सुरु झालेला प्रवास हिंदीतल्या 'मुंबई मेरी जान' पण सुरु राहिला. मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही ज्या मोजक्या दिग्दर्शकांकडे दीर्घ टप्पा गाठायची क्षमता होती. त्यात निशिकांत होता. निशिकांतच्या जाण्याने मी एक चांगला मित्र गमावलाच आहे. पण सिनेमावर भरभरून बोलणार एक रसिकदेखील गमावला आहे", अशा आशयाचे ट्वीट राज ठाकरे यांनी केले आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्रात मॉल्स उघडू शकतात, तर मग मंदिर का नाही? त्र्यंबकेश्वर येथील पुजाऱ्यांच्या भेटीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा राज्य सरकारला सवाल

राज ठाकरे यांचे ट्वीट-

पाच वर्षापूर्वी निशिकांत कामत यांनी अजय देवगन आणि तब्बू यांच्यासोबत 'दृष्यम', इरफान खानसोबत 'मुंबई मेरी जान' आणि 'मदारी', जॉन अब्राहमसोबत 'फोर्स' आणि रॉकी हँडसम' सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. मराठी चित्रपटांमध्ये 'डोंबिवली फास्ट' व्यतिरिक्त त्यांनी रितेश देशमुख आणि राधिका आपटे यांना घेऊन 'लय भारी', 'फुगे' या हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. 'सातच्या आत घरात' हा मराठी चित्रपट लिहिण्याव्यतिरिक्त त्यांनी या चित्रपटात अभिनय देखील केला होता. तसेच हिंदी चित्रपटांमध्ये विक्रमादित्य मोटवाने दिग्दर्शित 'भावेश जोशी' आणि 'रॉकी हँडसम' या सिनेमांतही निशिकांत कामत यांनी नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. 2022 मध्ये रिलीज होणार्‍या 'दर-ब-दर' या हिंदी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची ते तयारी करत होते.