भारतात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव पाहता देशात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे गेल्या अनेक दिवसांपासून महत्वाची भूमिका बजावत असल्याचे पाहायला मिळाले आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यसरकारसह (State Government) केंद्र सरकारचे (Central Government) अभिनंदन केले आहे. याशिवाय आपल्या जीवाची पर्वा न करता अत्यावश्यक सेवा देणारे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले आहेत. राज ठाकरे यांनी नुकतेच एका व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नागरिकांना संबोधित केले आहे. तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचे महत्वही लोकांना पटवून दिले आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला होता. असे असताना देखील आज मुंबई, पुण्यातील लोकांनी या लॉकडाऊन कडे सपशेल पाठ फिरवत रस्त्यावर एकच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. सरकारने वारंवार सांगूनही जनतेचा असा प्रतिसाद पाहून अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय मला नाईलाजास्तव घ्यावा लागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्याला संबोधित केले होते. त्यावेळी त्यांनी ही महत्वपूर्ण घोषणा केली. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाचे राज ठाकरे कौतूकी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले आहे की, “रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज्यातील परिस्थितीवर चर्चा झाली. यावेळी त्यांना मी देशातील विमानसेवा बंद करण्याची विनंती केली आहे. आजपर्यंत ज्यांनी डॉक्टरांवर हात उचलले त्यांना आता डॉक्टरांचे महत्त्व समजले असेल. आज मंदिरं बंद आहेत, पण रूग्णालये सुरू आहेत", असे मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Coronavirus: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळ, सार्वजनिक अथवा खाजगी भागातील गर्दी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी घेतला 'हा' महत्वाचा निर्णय
राज ठाकरे यांचे ट्वीट-
जीवावर उदार होऊन आपल्यासाठी काम करणाऱ्या डॉक्टरांचं, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सरकारी कर्मचारी, राज्य सरकार, केंद्र सरकारचं मनापासून आभार आणि अभिनंदन.
आजच्या माध्यमसंवादाचा युट्युब दुवा : https://t.co/pdMTGVVx1m
| राज ठाकरे सोशल मीडिया टीम
— Raj Thackeray (@RajThackeray) March 23, 2020
देशातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 9 वर पोहोचला आहे. आज (23 मार्च) पश्चिम बंगालमधील एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी महाराष्ट्रात 3, कर्नाटक, दिल्ली, पंजाब, गुजरातमध्ये प्रत्येक एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.