Coronavirus: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळ, सार्वजनिक अथवा खाजगी भागातील गर्दी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी घेतला 'हा' महत्वाचा निर्णय
Mumbai Police Logo | (Photo Credits: File Image)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. आता कोरोना व्हायरस भारतातही दाखल झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय गेल्या 24 तासात 50 पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून राज्यात कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यातच मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) खबदारीचा उपाय म्हणून धार्मिक, सार्वजनिक किंवा खाजगी ठिकाणी 5 किंवा त्यापेक्षा अधिकजण आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. आतापर्यंत राज्यात 89 कोरोना बाधित रुग्ण आढळल्याची आकडेवारी समोर आली आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रात बिकट परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी लागू केली आहे. दरम्यान, मुंबई पोलीसही महत्वाची भुमिका बजावत असल्याचे दिसून आले आहे. तसेच नागरिकांनी धार्मिक स्थळ, सार्वजनिक किंवा खाजगी भागात गर्दी करु नये, असे आवाहन केले आहेत. याशिवाय 5 किंवा त्यापेक्षा अधिक लोक एका ठिकाणी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आदेशही दिले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी कलम 144 लागू करण्यात आले असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन राज्य सरकारकडून वारंवार करण्यात येत आहे. हे देखील वाचा- कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशाअंतर्गत विमान वाहतूक सेवा 24 मार्च च्या मध्यरात्रीपासून बंद; सरकारचा मोठा निर्णय

मुंबई पोलिसांचे ट्वीट-

महाराष्ट्र करोनच्या धोकादायक उंबरठ्यावर आहे. बिकट परिस्थिती आणायची नसेल तर सरकारचे निर्देश काटेकोरपणे ऐका असे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. ती भीती लक्षात घेऊच आपण संचारबंदी लागू करत आहोत, असेही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य तसेच इतर आवश्यक सेवा सुरु राहतील. मात्र, ते वगळून पूर्ण संचारबंदी असेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला होता. असे असताना देखील आज मुंबई, पुण्यातील लोकांनी या लॉकडाऊन कडे सपशेल पाठ फिरवत रस्त्यावर एकच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. सरकारने वारंवार सांगूनही जनतेचा असा प्रतिसाद पाहून अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय मला नाईलाजास्तव घ्यावा लागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.