Raj Thackeray spotted on Mumbai-Mandwa RoRo: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला मुंबई मांडवा रो रो बोट प्रवासाचा अनुभव !
Raj Thackeray | (Photo Credits: File Photo)

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला लाभलेल्या भव्य समुद्रकिनारी मागील मार्च महिन्यापासून रो-रो सेवा (Ro-Ro Service) सुविधा सुरू झाली आहे. दरम्यान कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान बंद असलेल्या या वाहतूक सेवेला गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक पुन्हा सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. नुकताच मुंबईतील भाऊचा धक्का ते अलिबगच्या मांडवा (Mumbai-Mandwa)  दरम्यान या रो रो सेवेचा अनुभव मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील घेतला आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत मनसे नेते नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) देखील होते.

रो रो सेवा दरम्यान एकाचवेळी 1000 प्रवासी आणि 200 गाड्या वाहून नेण्याची क्षमता आहे. तसेच भाऊचा धक्का ते मांडवापर्यंतचा प्रवास केवळ 45 मिनिटं ते 1 तासात पूर्ण होतो. एम २ एम फेरी (M2M Ferries)  सव्‍‌र्हिसेसच्या अधिकृत वेबसाईटवरुन रो-रो बोटीच्या प्रवासासाठी ऑनलाईन बुकींग उपलब्ध आहे.

दरम्यान मुंबईकरांचा शॉर्ट विकेंडसाठी अलिबागला जाण्यासाठी रस्ते मार्गाऐवजी या रो रो सेवेने प्रवास करण्याकडे कल चांगला दिसत आहे. सध्या सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत लोकांना रो रो सेवा उपलब्ध करून दिली आहे. मार्च महिन्यात रो रो सेवेचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या हस्ते झाला होता. दरम्यान त्यानंतर निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर अलिबाग, रायगड दौर्‍यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी देखील रो रो सेवेचा अनुभव घेतला होता. त्यापाठोपाठ खासदार अमोल कोल्हे यांच्यासोबत सुप्रिया सुळे देखील अलिबागला रो रो सेवेच्या माध्यमातून दाखल झाल्या होत्या. तेव्हा त्यांनाही मुंबई ते अलिबाग दरम्यान प्रवासाचे क्षण सोशल मीडियामध्ये शेअर करण्याचा मोह आवरता आला नव्हता. Nisarga Cyclone: निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या रायगड जिल्ह्याच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रवाना; पहा रो-रो बोटीतील प्रवासादरम्यानचे फोटोज.

 

खाजगी बस, वाहनं, एसटी यापेक्षा मुंबई ते मांडवा हा प्रवास रोरो च्या माध्यमातून करणं ही वेळेची बचत देखील आहे सोबतच हा प्रवास एक वेगळा अनुभव देणारा  देखील आहे.