![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/06/2020-06-04-5-380x214.jpg)
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाने (Nisarga Cyclone) रायगड जिल्ह्याला जबरदस्त फटका बसला. या मुळे येथील लोकांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेकांची घरे उद्धस्त झाली आहेत. यामुळे येथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज रायगड जिल्ह्याच्या पाहणीदौरा करणार आहेत. यासाठी थोड्याच वेळापूर्वी ते मुंबईतील भाऊचा धक्का येथून रो-रो बोटीतून मांडवा अलिबागकडे रवाना झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सोबत महाराष्ट्राचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हेदेखील त्यांच्या सोबत आहे.
रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची आज मुख्यमंत्री पाहणी करतील. यासाठी ते रो-रो बोटीतून ते अलिबागकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज रायगड दौरा; निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी
पाहा रो-रो बोटीतील प्रवासादरम्यानचे फोटोज
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/06/2020-06-04-3-1.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/06/2020-06-04-1-1.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/06/2020-06-04-4-1.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/06/2020-06-04-2-1.jpg)
पालघर, पुणे आणि रायगडसह 14-15 जिल्ह्यात निसर्ग या चक्रीवादळामुळे नुकसान झाले आहे. या जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणाबाबचा अहवाल राज्य सरकार देण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली.