मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी ट्वीट करत 'तूर्तास अयोद्धा दौरा स्थगित' असं जाहीर केलं होते. त्यानंतर 22 मे ला पुण्याच्या सभेत अयोद्धा दौरा स्थगित करण्यामागील स्पष्टीकरण देताना महाराष्ट्रातूनच विरोधाची रसद पुरवल्याचा आरोप करत आपल्याला सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं सांगितलं. राज ठाकरे यांच्या या आरोपानंतर नेमकी कुणी ट्रॅप रचला असावा? यावरून अनेक उलट सुलट चर्चा रंगल्या होत्या.
राज ठाकरेंच्या अयोद्धा दौर्याला विरोध करत भाजपा खासदार बृजभूषण सिंग यांनी टोकाची भूमिका घेतली होती. मनसे नेते सचिन मोरे यांनी ट्वीटर वर याच बृजभूषण सिंग आणि एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांचा एकत्र फोटो पोस्ट केला आहे. 'कुछ फोटो अच्छे भी होते है.. और सच्चे भी होते है…' या कॅप्शन सह शेअर केलेल्या फोटोमुळे पुन्हा चर्चा रंगल्या आहेत. पुण्याच्या सभेनंतर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी राज ठाकरेंच्या अयोद्धा विरोधाची रसद शरद पवारांनीच पुरवल्याचं मीडीयाशी बोलताना म्हटलं आहे.
सचिन मोरे ट्वीट
कुछ फोटो अच्छे भी होते है.. और सच्चे भी होते है…@RajThackeray @BalaNandgaonkar @abpmajhatv @lokmat @mataonline @zee24taasnews @SandeepDadarMNS @ABPNews pic.twitter.com/Esic3lcn2Y
— Sachin Maruti More (@mnsmoresachin) May 23, 2022
मागील काही दिवसांपासून मनसे कडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर सडकून टीका केली जात आहे. पुण्याच्या सभेत राज ठाकरेंनी एक खासदार मुख्यमंत्र्याला आव्हान देण्याची कशी करू शकतो? असा सवाल विचारला होता.
दरम्यान बृजभूषण सिंह हे मागील काही वर्षांपासून भारतीय कुस्ती महासंघांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, तर शरद पवार हे राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आहेत. मनसे नेत्याने शेअर केलेले फोटो एका कुस्ती स्पर्धेतील आहे. त्यामध्ये शरद पवार, त्यांची लेक सुप्रिया सुळे आणि बृजभूषण सिंह एकत्र पहायला मिळत आहेत.