Bala Nandgaonkar On Uddhav Thackeray: राज्यातील मंदिर उघडवण्याच्या निर्णयावर मनसे (MNS) अधिक आक्रमक भूमिका घेतना दिसत आहे. पुनःश्च हरी ॐ म्हणता व 'हरी'ला चं कोंडून ठेवता, अशी खोचक टीका मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) केली आहे. बाळा नांदगावकर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. बाळा नांदगावकर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून म्हटलं आहे की, 'पुनःश्च हरी ॐ म्हणता व "हरी" ला च कोंडून ठेवता. बार उघडले, मग बार ची वेळ देखील वाढवून दिली. आता जलतरण तलाव, मल्टिप्लेक्स ला परवानगी, मग कोरोना फक्त मंदिरातचं होईल का? काय तर्क (Logic) असावा या मागे हे कोडेचं आहे. हा केवळ भावनेचा नाही तर तेथील संबधित हजारो व्यावसायिकांच्या उपजीविकेचा व रोजगाराचा देखील प्रश्न आहे,' असंही नांदगावकर यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - Maharashtra Mission Begin Again अंतर्गत नोव्हेंबर महिन्यात काय सुरु राहणार आणि काय बंद? जाणून घ्या)
तेथील संबधित हजारो व्यावसायिकांच्या उपजीविकेचा व रोजगाराचा देखील प्रश्न आहे.@CMOMaharashtra ,@mnsadhikrut ,@abpmajhatv ,@News18lokmat ,@zee24taasnews ,@TV9Marathi
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) November 6, 2020
राज्यात गुटखा बंदी असली तरीदेखील चोरट्या मार्गाने गुटख्याची विक्री केली जात आहे. गुटखा सेवन करून लोक सार्वजनिक ठिकाणी थुंकतात. परिणामी सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. त्यामुळे देशभरात गुटखा विक्रीवर बंदी करायला हवी, अशी मागणीदेखील बाळा नांदगावकर यांनी केली आहे.
दरम्यान, तुळजापुरमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आला आहे. गुरुवारीपासून भाजप आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांच्या नेतृत्त्वात तुळजाभवानी मंदिर परिसरात वेबमुदत ठिय्या आंदोलन सुरु होतं. मात्र, प्रशासनाने आंदोलनकर्त्यांचा मंडप काढला होता. त्यामुळे सध्या भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. राज्यातील मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी भाजप आध्यात्मिक आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे.