MNS Chief Raj Thackeray | (Photo Credits: Facebook)

Maharashtra Assembly Elections 2019: राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार जाण्यास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) हेच जबाबदार असल्याचा अप्रत्यक्ष टोला राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लगावला आहे.J

या वेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, मी इथे काही सांगायला नव्हे तर आपल्याला अनेक गोष्टींची आठवण करुन देण्यासाठी आलो आहे. अनेक अश्वासन देऊन भाजप सरकार सत्तेत आले. पण, त्यातील एकही अश्वासन सरकारने पूर्ण केल नाही. गेल्या पाच वर्षात तब्बल 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, हे फार वाईट असल्याचे ठाकरे म्हणाले.

माझ्या हातून महाराष्ट्राचा उत्कर्ष व्हावा ही माझी प्रामाणीक भावना आहे. माझ्या सभा तुम्ही केवळ गंमत म्हणून ऐकत असाल आणि सरकारकडून आपेक्षा करत असाल. तर, तुमच्या समस्या कधीच संपणार नाहीत हे ध्यानात ठेवा असे भावनिक अवाहन करताना राज ठाकरे म्हणाले, हे सरकार महाराष्ट्राची प्रगती करु शकत नाही. आज नोटबंदीसारख्या निर्णयामुळे देशात मंदी आहे. देशातील उद्योगधंदे बंद होत आहेत. सरकारी उद्योग हळूहळू खासगी उद्योगपतींच्या घशात घालण्याचा सरकारचा विचार स्पष्ट दिसतो आहे, असा आरोपही राज ठाकरे यांनी केला.

आज आपला सर्वसामान्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी मला सत्ता हवी आहे. आज प्रत्येकाला घाई आहे. सत्तेत जाण्याची. जो तो उठतोय आणि सत्तेत सहभागी होतो आहे. जर सर्वांनाच सतत्तेत जायचे आहे. तर, मग सर्वसामान्यांचे आवाज मांडणार कोण? असा सवाल उपस्थित करत सर्वासामान्यांचा आवाज बनण्यासाठीच मला सक्षम विरोधी पक्ष म्हणून भूमिका पार पाडायची आहे, असे राज ठाकरे म्हणाले. एकवेळ पाशवी बहुमत मिळालं तर, तुमचा आवाज मांडण्यासाठी कोणी उरणारच नाही, असा सावधगिरीचा इशाराही राज यांनी उपस्थित जनतेला दिला.