Raj Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवेसनेशी (Shiv Sena) आमचे वैर नाही पण आमचा विरोध सरकारला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS ) जोपर्यंत परप्रांतीयांबद्दलचे आपले धोरण बदलत नाही तोपर्यंत आमची त्यांच्याशी युती होणे शक्य नाही. राज ठाकरे (Raj Thackeray) हे महाराष्ट्राला हवे असेलेले नेते आहेत. ते महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणू शकत नाही, असे भविष्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी वर्तवले आहे. शिवया अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) ही स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे तिच्याबाबत मी अधिक बोलू शकणार नाही. परंतू, मध्यरात्री ईडी कोणत्याही एका मोठ्या नेत्याला अटक करु शकते, असे सूचक विधानही चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पारश्वभूमीवर चंद्रकांत पाटील हे नाशिक दौऱ्यावर आहेत. या वेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

'कोणत्याही एका नेत्याला मध्यरात्री अटक होऊ शकते'

राजकारणामध्ये कोणीही कोणाचा कायम मित्र किंवा शत्रू नसतो. स्थानिक पातळीवर काही तडजोडी असतात, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी भविष्यात भाजप-शिवसेना युतीबाबत सांकेतीक भाष्य केले. नाशिक भाजपच्या संघटात्मक बैठकीसाठी चंद्रकांत पाटील नाशिक शहरात रात्री उशीरा दाखल झाले. या वेळी प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना ईडीच्या चौकशीबाबत विचारले असता ते म्हणाले, ईडी ही स्वायत्त संस्था आहे. त्यांच्या कारावाईबाबत अधिक बोलता येणार नाही. परंतू, कोणत्याही एका नेत्याला मध्यरात्री अटक होऊ शकते. चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्याचा रोख हा प्रामुख्याने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (हेही वाचा, अनिल देशमुख यांच्यावरील ईडीच्या कारवाईनंतर भाजप नेते प्रविण दरेकर, किरीट सोमय्या यांच्या प्रतिक्रीया (Watch Videos))

'पंकजा मुंडे यांच्याच नव्हे इतर कारखान्यांवरही कारवाई'

पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याचे बँक खाते गोठविण्यात आले. याबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, केवळ पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ यांच्याच नव्हे तर राज्यात गैरकारभार करणाऱ्या 90% कारखान्यांवर कारवाईह होत आहे. तसेच, पक्षात पंकजा मुंडे नाराज नाहीत. त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. कारखान्याच्या नोटीशीचा आणि नाराजीचा संबंध नाही असेही पाटील म्हणाले.