महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर ईडीने (ED) संपत्ती जप्तीची कारवाई केली आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) अनिल देशमुख आणि कुटुंबियांची तब्बल 4 कोटी 20 लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली. यावरुन विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) आणि भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी अनिल देशमुखांसह महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. (Money Laundering Case: अनिल देशमुख यांना ED चा झटका; 4.20 कोटींची मालमत्ता जप्त)
प्रविण दरेकर यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत आपली प्रतिक्रीया दिली आहे. व्हिडिओत ते म्हणतात, "राजकीय सुडापोडी केंद्र सरकार आणि एजन्सीज काम करत असल्याचे बोलणाऱ्यांना ही चपकार आहे. तपासात मालमत्ता हाती लागली ती जप्त झाली याचा अर्थ तक्रारीत, तपासणेत तथ्य आहे. कोणत्याही तपास यंत्रणांना मनमानी करता येत नाही. त्यामुळे भाजप, केंद्र सरकार आणि तपास यंत्रणांवर आरोप करणाऱ्यांचे आता समाधान होईल. आता या केसमध्ये तथ्य असल्याचे पुरावे दिसून येत आहेत आणि भविष्यात या केसमधील एक-एक तथ्य व सत्य समोर आल्याशिवाय राहणार नाही."
प्रविण दरेकर ट्विट:
राजकीय सूडापोटी कारवाई होत असल्याचा आरोप करणाऱ्यांचे कदाचित आता समाधान होईल, कारण माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या केसमध्ये तथ्य असल्याचे पुरावे दिसून येत आहेत!@BJP4Maharashtra pic.twitter.com/kzQmSk0IMF
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) July 16, 2021
किरीट सोमय्या यांनी व्हिडिओत म्हटले की, "अनिल देशमुख याने एकंदर 100 कोटींचं मनी लॉड्रिंग केलं आहे. नागपूर, मुंबई, उरण जेएनपीटी येथे जमिनी घेतल्या असून चॅरिटेबल ट्रस्टमध्ये पैसे गुंतवणून ठेवले आहेत. त्यामुळे कधीना कधी त्यांना ईडीसमोर यावे लागणार आणि 100 कोटींच्या आरोपाखाली जेलमध्ये जावे लागणार."
किरीट सोमय्या ट्विट:
अनील देशमुख ₹१०० कोटीचा मनी लॉन्ड्रिंग व्यवहारात गुंतले आहे. आज ईडीने 420 लाख ची मिळकत जप्त केली, हळू हळू ₹100 कोटींची मालमत्ता जप्त होणार
मला खात्री आहे की एके दिवशी अनिल देशमुखला ईडीकडे हजर व्हावे लागणार आणि नंतर जेलला जावे लागेल @BJP4Maharashtra pic.twitter.com/DyEBMcm0tM
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 16, 2021
अनिल देशमुख यांची कोट्यावधींची संपत्ती ईडीने आज जप्त केली. यापूर्वी ईडीने अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरांवर छापे टाकले होते. त्याचबरोबर देशमुख यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलाला देखील ईडीने समन्स बजावले होते. तसंच यापूर्वी अनिल देशमुख यांचे पीए संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडीने अटक केली होती.