Sanjay Raut | Twitter

Narendra Bhondekar News: शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महिला आरक्षण विधेयकावर दिलेल्या प्रतिक्रियेवरुन एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी जोरदार टीका केली आहे. ही टीका करत असताना भोंडेकर यांनी तीव्र शब्दांचा वापर करत म्हटले की, राऊत हा महामूर्ख माणूस आहे. त्यांनी मूर्खपणाचाही कळस गाठला आहे. त्यांना गाढवावर बसवून फिरवायला पाहिजे. भाजप आमदार नितेश राणे यांनी राऊत यांना शक्तीकपूर म्हणून संबोधल्यावर दिलेल्या प्रतिक्रेदरम्यान भंडारा येथील आमदार भोंडेकर बोलत होते.

संजय राऊत यांनी महिला आरक्षणावर दिलेली प्रतिक्रिया म्हणजे महिलांचा अपमान आहे. या विधेयकाला सर्व पक्षियांनी पाठिंबा दिला. यामध्ये उद्धव ठाकरे गटाचाही समावेश आहे. हे विधेयक 454 मतांनी लोकसभेमध्ये मंजूर झालं. मात्र, या विधेयकाला संजय राऊत यांचा एकट्याचाच विरोध होता. त्यामुळे त्यांना शक्तीकपूरपेक्षाही मोठी उपाधी द्यायला हवी. इतकेच नव्हे तर त्यांना गाढवावरुन फिरवायला पाहिजे असेही भोंडेकर म्हणाले.

दरम्यान, औपचारिकपणे 128 वी घटना दुरुस्ती विधेयक म्हणजेच महिला आरक्षण विधेयक संसदेमध्ये दोन्ही सभागृहात मंजूर झाले आहे. या विधेयकास 128 वी घटना दुरुस्ती विधेयक किंवा नारी शक्ती वंदन अधिनियम म्हणून ओळखले गेले. या ऐतिहासिक विधेयकाचे उद्दिष्ट लोकसभा आणि राज्य विधानसभेतील एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याचे आहे. लोकसभेने मंजूर केलेले महिला आरक्षण विधेयक, भारतीय राजकीय प्रतिनिधित्वामध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करते. ज्यामध्ये लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवण्याचा प्रस्ताव आहे. हे पाऊल भारताच्या राजकीय परिदृश्यात लैंगिक समानतेला चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.