मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme) लाभार्थी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषाणा केली आहे. कर्जमाफी योजनेचा लाभ लाभार्थी असलेल्या शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जाईल. आतापर्यंत 27 लाख 38 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यात आला आहे. अशी माहितीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. कर्जमुक्ती लाभासाठी पात्र असलेल्या जवळपास 83 टक्के खातेदारांना या योजनेचा लाभ मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लाभार्थी शेतकऱ्यांची नावे पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. आतापर्यंत 32.90 लाख पात्र शेतकऱ्यांची नावे पोर्टलवर प्रसिद्ध झाली आहेत. आतापर्यंत 27.38 लाख खातेधारकांना तब्बल 17 हजार 646 कोटी रुपये इतक्या रकमेचा लाभ मिळाला आहे. हा लाभ 20 जुलै 2020 अखेरचा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. (हेही वाचा, कर्जमाफी झाली आता लग्नाला या...! शेतकऱ्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण)
दरम्यान, कर्जमाफी योजनेसाठी पात्र असलेल्या शेवटच्या लाभार्थ्यासही कर्जमाफीचा लाभ मिळायला हवा. त्यासाठी कर्जमाफई योजना गतीमान करायला हवी. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे विशेषत्वाने लक्ष द्यायला हवे अशी भावनाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.