ST Bus | (Photo Credit: MSRTC)

कोरोना व्हायरस (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेला लॉकडाऊन (Lockdown) हटवत महाराष्ट्र हळूहळू 'पुनश्च हरी ओम' Mission Begin Again) म्हणत आहे. बंद केलेल्या सेवा पुन्हा सुरु करत आहे. मात्र, नागरिकांच्या मनातील भीती अद्यापही कमी व्हायला तयार नाही. नागरिकांच्या मनातील भीती आंतरजिल्हा एसटी सेवा प्रवासाच्या माध्यमातून स्पष्टपणे पुढे आली. राज्यात आजपासून महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ (MSRTC) एसटी बस सेवा (ST Bus Service) सुरु करण्यात आली. मात्र, एसटी सेवा सुरु झाल्याची पूरेशी माहिती न मिळाल्याने म्हणा किंवा कोरोना व्हायरस संसर्गाच्या भीतीने म्हणा प्रवाशांनी एसटी प्रवासाकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसले. परिणामी रस्त्यांवरु सुरुवातीच्या काळात एसटी बस (ST Bus) एकाददुसऱ्या प्रवाशांचा अपवाद वगळता रिकामीच धावताना दिसली.

राज्यात आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक करण्यास राज्य परिवहन मंडळाच्या बसला राज्य सरकारने आजपासून  परवानगी दिली. त्यानुसार बसस्थानकांवर एसटी दाखलही झाल्या. मात्र, प्रवासीच नसल्याने बसस्थानकांवर सामसू म होते. त्यामुळे प्रवाशांकडून अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र प्रथमदर्शनी तयार झाले आहे. अर्थात ही आज सकाळीची स्थिती आहे. दुपारनंतर कदाचित चित्र बदलूही शकते. (हेही वाचा, खुशखबर! महाराष्ट्रात आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी ST Bus ला परवानगी)

राज्यातील एसटी बस सेवा बंद होऊन साधारण पाच महिन्यांपेक्षाही अधिक काळ उलटून गेला. त्यामुळे प्रदीर्घ काळानंतर आज एसटी बस बसस्थानकांवर दाखल झाल्या. प्रदीर्घ काळानंतर बस सेवा सुरु होत असल्यामुळे प्रवाशांची गर्दी पाहायला मिळेल अशी आशा होती. प्रत्यक्षात तसे घडले नाही. प्रवाशांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

दरम्यान, एसटी वाहतूकीस प्रवाशांकडून न मिळालेल्या प्रसिदाबद्दल विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. काहींच्या मते एसटी वाहतूक सुरु झाल्याची माहिती अद्यापही नागरिकांपर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचली नाही. तर काहींना वाटते की प्रवासासाठी खूप लोक गर्दी करतील. त्यातून कोरोना संसर्ग होण्याची भीती वाटत असल्याने लोक प्रवास करणे टाळत आहेत.