Mumbai Cyber Crime: ऑनलाईन क्लास सुरु असताना Porn Video सुरु; विलेपार्ले परिसरातील महाविद्यालयीन प्राध्यापकाकडून मुंबई पोलिसांत तक्रार
Online Education | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीमुळे विद्यापीठे, विविध शिक्षण संस्था आदींनी ऑनलाईन शिक्षणावर (Online Education) भर दिला आहे. ऑनलाईन शिक्षण प्रणाली ही बहुतांश विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक संस्थांसाठीही नवी आहे. त्यामुळे त्याचे फायदे-तोटेही तितकेच नवीन आहेत. अशात या प्रणालीदरम्यान काही गैरप्रकारही पुढे येत आहे. असाच एक गैरप्रकार मुंबई (Mumbai ) येथील विलेपार्ले (Vile Parle) परिसरात असलेल्या एका महाविद्यालाच्या ऑनलाईन क्लास (Online Class) वेळी घडला. या महाविद्यालयाचा ऑनलाईन क्लास (Online Learning) सुरु असताना काही टवाळखोरांनी चक्क अश्लील चित्रफीत (Porn Video) सुरु केली. क्लास सुरु असताना अचानक पॉर्न व्हिडिओ (Porn Video) सुरु झाल्याने शिक्षक, विद्यार्थी गोंधळून गेले. अखेर महाविद्यालयाने पोलिसात तक्रार दिली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई शहरातील विलेपार्ले परिसरातील महाविद्यालयाचा ऑनलाईन क्लास सुरु होता. हा क्लास सुरु असताना काही टवाळखोरांकडून अचानक पॉर्न व्हिडिओ सुरु झाला. महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि प्रशासनाकडून पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन भारतीय दंड संहिता कलम 292, 570 आणि आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. जुहू पोलिस या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत आहेत. हे प्रकरण चार पाच दिवासांपूर्वीचे आहे. (हेही वाचा, Online Class च्या ग्रुपवर Porn Video पोस्ट करणार्‍या शिक्षकाला अटक; कोल्लम मधील घटना)

कोरोना व्हायरस महामारीचा विविध क्षेत्रांना जोरदार फटका बसला आहे. त्या फटक्यातून सावरताना विविध क्षेत्रे अधिक सुरक्षीत आणि जमेल तसा मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. शिक्षण क्षेत्रानेही ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून असाच मार्क काढण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक ठिकणी ऑनलाईन शिक्षणाला प्रचंड मर्यादा आहेत. असे असले तरी, हे शिक्षण सुरु आहे. हे शिक्षण सुरु असताना काही टवाळखोर तांत्रिक अडचणींचा फायदा घेऊन भलतेच उद्येग करु पाहात आहेत. विलेपार्ले येथील महाविद्यालीयीन ऑनलाईन तासिकेवेळी घडलेला प्रकारही अशाच पद्धतीचा आहे.

कोरोनासारख्या महामारीमुले ऑनलाईन पद्धतीचा स्वीकार सध्यातरी नाईलाजाने करावा लागला तरी, ऑनालईन प्रणालीचा वापर करताना त्यातील नव्या अडचणी, आव्हाने आणि मर्यादा यांचा विचार करुनच त्याचा स्वाकार करायला हवा. त्याचे भविष्यकालीन फायदे, तोटे यावरही विचार व्हावा. त्यानंतरच ऑनलाईन शिक्षण हा प्रकार राज्य आणि देशात राबावावा, असे तज्ज्ञ सांगतात.