Online Class च्या ग्रुपवर Porn Video पोस्ट करणार्या शिक्षकाला अटक; कोल्लम मधील घटना
केरळ (Kerala) मध्ये कोल्लम (Kollam) येथील एक शाळेतील 5वीच्या विद्यार्थ्यांचा असाच एक ऑनलाईन वर्ग भरला होता. मात्र अचानक या क्लासच्या ऑनलाईन ग्रुप वर शिक्षकाकडूनच पॉर्न व्हिडीओ (Porn Video) पाठवण्यात आल्याचे समजत आहे.
लॉकडाउन (Lockdown) काळात ऑनलाईन लेक्चर (Online Lecture) च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु ठेवण्याचा प्रयत्न सुरु आहे. केरळ (Kerala) मध्ये कोल्लम (Kollam) येथील एक शाळेतील 5 वी च्या विद्यार्थ्यांचा असाच एक ऑनलाईन वर्ग भरला होता. मात्र अचानक या क्लासच्या ऑनलाईन ग्रुप वर शिक्षकाकडूनच पॉर्न व्हिडीओ (Porn Video) पाठवण्यात आल्याचे समजत आहे. मारुथमोनपल्ली या भागात ही घटना घडली असून यानंतर केरळ मधील भाजप व KSU या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शिक्षकाच्या विरुद्ध आंदोलन करत त्याच्या अटकेची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 45 वर्षीय शिक्षक मनोज के मॅथ्यू (manoj K Mathew) यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. Lock Down मध्ये पॉर्न पाहणाऱ्या भारतीयांची संख्या 95% वाढली; Pornhub वर सर्वात जास्त सर्च होतंय COVID आणि Corona!
प्राप्त माहितीनुसार, हा सर्व प्रकार मंगळवारी 9 जून रोजी घडला , सकाळी 11 वाजता ऑनलाईन क्लास सुरू असताना हा पॉर्न व्हिडीओ शिक्षकाच्या नंबर वरून ग्रुप वर पाठवण्यात आला. हा व्हिडीओ पाहून विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांना याबाबत सांगितले असता काही पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापिका कार्यालयात संपर्क करून याबाबत माहिती दिली. ही तक्रार ऐकताच मनोज यांना कॉल करून याबाबत विचारणा करण्यात आली.
मनोज यांनी आपल्याकडून हा व्हिडीओ चुकून पाठवला गेल्याची माहिती दिली. आपण लेक्चर घेत असताना आपल्या अन्य एका मित्राने हा व्हिडीओ वेगळ्या ग्रुप वर पाठवला होता, तो काढून टाकताना चुकून तो शाळेतील क्लासच्या ग्रुप वर पाठवला गेला. असे मनोज यांनी सांगितले तसेच याप्रकरणी लिखित माफी सुद्धा त्यांनी मागितली आहे. Coronavirus थीम असलेल्या पॉर्नचा धुमाकूळ?; XXX व्हिडीओ स्ट्रीमिंग साइट Pornhub ने सादर केले कोरोना व्हायरसची भीती कमी करण्यासाठी Porn Videos
दरम्यान हा प्रकार घडताच केरळच्या भाजप व केएसयू तर्फे शाळेच्या मुख्याध्यापिका कार्यालायत जाऊन आंदोलन करण्यात आले होते. जेव्हा शाळेतून या शिक्षकावर कठोर कारवाई करण्याचे वचन दिले गेले तेव्हा या आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन थांबवले.
(The above story first appeared on LatestLY on Jun 10, 2020 02:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

