(Archived, edited, symbolic images)

नवऱ्याने टक्कल असल्याचे लपवल्याने एका 27 वर्षीय नवविवाहित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ही घटना मिरा रोडमधील (Mira Road) नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून तिच्या पतिविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचे काही महिन्यांपूर्वी आरोपीशी लग्न झाले आहे. दरम्यान, टक्कल  लवपण्यासाठी आरोपीने विगचा वापर केल्याची माहिती पत्नीला कळाल्यानंतर तिने थेट नयानगर पोलीस ठाणे गाठले आणि पती आणि सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दिली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

फिर्यादी महिलेचे याच वर्षी सप्टेंबर महिन्यात आरोपीशी लग्न झाले होते. दरम्यान, आपल्या पतीचे टक्कल असून ते लवण्यासाठी विगचा वापर करतो, असे तिला कळाले. त्यानंतर तिने याबाबत आपल्या सासू- सासऱ्याकडे विचारणा केली. लग्नाच्या वेळी तुम्ही ही बाब माझ्यापासून लपवली. तसेच माझी फसवणूक केली, असे तिने सासू-सासऱ्यांना सांगितले. यानंतर तिने थेट नयानगर पोलीस ठाणे गाठले आणि पती आणि सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दिली. तसेच हुंड्यासाठी तिचा मानसिक छळ होत असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. हे देखील वाचा- कोल्हापूर: भररस्त्यात विनयभंग केल्याने तणनाशक प्राशन करून तरुणीची आत्महत्या; आरोपींविरोधात गुन्हा दाखल

 या प्रकरणी पोलिसांनी फिर्यादी महिलेचा पती आणि सासरच्या सदस्यांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ठाणे न्यायालयाने पतीचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला असून, त्याला पोलिसांसमोर हजर होण्यास सांगितले आहे. तर, इतर आरोपींना अंतरिम जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती टाईम्स ऑफ इंडियाने आपल्या वृत्तात दिली आहे.