कोरोनाची परिस्थिती पाहता आणि आजपासून दिवाळीचा सणाला सुरुवात झाल्याच्या कारणास्तव नागरिकांनी गर्दी करु नये असे आवाहन यापूर्वीच करण्यात आले आहे. याच पार्श्वभुमीवर आता मिरा-भायंदर (Mira-Bhynder) येथे सणासुदीच्या काळात नागरिकांनी गर्दी करु नये यासाठी येत्या 20 नोव्हेंबर पर्यंत कमल 144 लागू करण्यात आला आहे. तर मिरा-भायंदर वसई-विरार मध्ये आयुक्तांनी दिवाळी आणि छट पूजा दरम्यान गर्दी करुन नये अशा सुचना दिल्या आहेत.(दिवाळीचा सण आनंद, उत्साहात सजारा करताना कोरोनाच्या नियमांचे पालन करा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागरिकांना आवाहन)
छट पूजा दरम्यान होणारी गर्दी पाहता नागरिकांसाठी कलम 144 लागू करण्यात आला आहे. त्यामुळे एकाच वेळी पाच किंवा त्याहून अधिक व्यक्ती एकत्रित येण्यास बंदी घातली आहे. त्याचसोबत मोर्चा काढणे, भाषण, रॅली, पुतळे जाळण्यावर ही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या गोष्टींचे पालन न केल्यास त्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे.
तर नालासोपारा मधील तुलिंग येथे नागरिकांची सणासुदीच्या खरेदीसाठी तुफान गर्दी दिसुन आली. तर अकोलो. संतोष भुवन, ओस्तावल नगरी या ठिकाणी ही नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून आली. त्याचसोबत नागरिकांनी मास्क सुद्धा न घातल्याने दिसले.(Diwali 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा, अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह 'या' नेत्यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा)
दरम्यान, गेल्या रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रथम दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेचराज्यात प्रदुषण करणारे फटाके टाळण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. सार्वजनिक ठिकणी फटाके वाजवू नका असे ही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. दिवाळी आणि त्यानंतरचे पुढील 15 दिवस अत्यंत महत्वाचे असल्याचे ही उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.