ग्लोबल टीचर प्राईज (Global Teacher Prize) वर नाव कोरलेले शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjit Disale) यांचा फुलब्राइट स्कॉलरशिप (Fulbright Scholarship) साठी परदेशामध्ये जाण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी या प्रकरणी लक्ष घालत सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निर्देश देत स्कॉलरशिपसाठी आवश्यक परवानगी दिली जावी, त्यांना परदेशात पाठवायचं आहे असे ट्वीट करत जाहीर केले आहे.
दरम्यान शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांनी त्यांना त्रास दिल्याचा प्रकार समोर आला होता. यामुळे डिसले गुरुजी सरकारी नोकरी सोडण्याच्या विचारात असल्याचं सांगितलं जात होतं. पैशांची मागणी करण्यासह फुलब्राइट स्कॉरलशिपसाठी केलेल्या अर्जावर वेळेत निर्णय घेण्यात आलेला नाही. याच कारणास्तव फुलब्राइट स्कॉलरशिप हातातून जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती. पण यानंतर मीडीयाने ही बाब उचलून धरल्याने डिसलेंवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या आहे. हे देखील नक्की वाचा: Maharashtra: रणजित डिसले गुरुजींना शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून त्रास, नोकरी सोडण्याचा विचार .
Ranjit Disale ट्वीट
माननीय शिक्षणमंत्री @VarshaEGaikwad यांनी घेतलेल्या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो। या निर्णयामुळे फुलब्राइट स्कॉलरशिप ची संधी हुकणार नाही, याचा आनंद आहे।
यानिमित्ताने मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो https://t.co/KBV7hQ0GE3
— Dr.Ranjitsinh (@ranjitdisale) January 22, 2022
फुलब्राईट स्कॉलरशिप ही अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी एक प्रतिष्ठित स्कॉलरशिप आहे. 2021 मध्ये जगभरातील 40 शिक्षकांना ही प्रतिष्ठेची स्कॉलरशिप जाहीर झाली आहे. लेट्स क्रॉस द बॉर्डर या उपक्रमाच्या माध्यमातून जगभरातील अशांत देशातील मुलांना एकत्र आणून त्यांच्यात अहिंसेच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम करण्यासाठी ही स्कॉलरशीप दिली जाते.