Maharashtra: रणजित डिसले गुरुजींना शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून त्रास, नोकरी सोडण्याचा विचार
रणजितसिंह डिसले गुरुजी (PC - ANI)

Maharashtra: ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले गुरुजींना अवॉर्ड मिळाल्यानंतर शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांनी त्रास दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे डिसले गुरुजी सरकारी नोकरी सोडण्याच्या विचारात आहेत. पैशांची मागणी करण्यासह फुलब्राइट स्कॉरलशिपसाठी केलेल्या अर्जावर अजूनही निर्णय घेण्यात आलेला नाही. याच कारणास्तव फुलब्राइट स्कॉलरशिप हातातून जाण्याची शक्यता असल्याचे डिसले गुरुजींनी म्हटले आहे. त्यावेळी ते एबीपी माझा सोबत बोलत होते.(Maharashtra School Reopen: विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे कोविडविषयक नियमांचे पालन करुन पुन्हा सुरु करण्याचे निर्देश- धनंजय मुंडे)

डिसले गुरुजींनी पुढे असे ही म्हटले की, राज्यपालांशी थेट संपर्क साधला म्हणून त्याचा राग अधिकाऱ्यांनी मनात धरला. त्यामुळे अशा वातावरणात राहणे शक्य नसल्याचे डिसले गुरुजींनी म्हटले आहे. याबद्दल परिवारातील मंडळींशी सुद्धा चर्चा केली. सातत्याने होणाऱ्या आरोपांमुळेच हा निर्णय घेतल्याचे डिसले गुरुजींनी म्हटले आहे. (Club House App Chat Case: क्लबहाऊस अॅप चॅट प्रकरणी मुंबई पोलिसांकडून हरियाणातून तीन जणांना अटक)

रणजित डिसले यांच्यावर काही आरोप करण्यात आले आहेत. त्यानुसार डिसले गुरुजी हे गेल्या तीन वर्षांपासून शाळेच्या येथे आलेच नाहीत. त्यांनी त्या काळात काय केले असे प्रश्न सोलापूरच्या जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकाऱ्यांकडून विचारण्यात आले आहेत.त्या संदर्भातील चौकशी अहवाल सुद्धा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला मिळाला आहे. या कारणास्तव डिसले गुरुजींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे शिक्षणाधिकारी डॉ. लोहार यांनी म्हटले आहे.