Mahad Accident: महाड दुर्घटनेत अनेकांचे प्राण वाचविणाऱ्या नावेद ची मंत्री उदय सामंत यांनी घेतली भेट
Uday Samant called on Naved (PC - Twitter)

Mahad Accident: महाड दुर्घटनेत आपल्या जीवाची पर्वा न करता नावेद यांनी 35 व्यक्तींचे प्राण वाचविले आहेत. यामध्ये त्याला आपले दोन्ही पाय गमाविण्याची वेळ आली आहे. त्यांच्यावर सध्या नेरूळ येथील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची तब्बेत आता चांगली आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितले आहे.

आज सामंत यांनी नावेद यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, नावेदला आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. त्याच्या तब्बेतीमध्ये सुधारणा होत असून तो लवकर बरा होईल, असंही उदय सामंत यांनी सांगितलं. (हेही वाचा - Shivling Shivacharya Maharaj Passes Away : शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे वयाच्या 104 वर्षी निधन)

नावेद यांनी महाड दुर्घटनेत अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शौर्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याच्या शौर्याची दखल घेऊन त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असं आश्वासनदेखील उदय सामंत यांनी दिले. तसेच त्याच्या तब्बेतीबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली. नावेद यांची प्रकृती व्यवस्थित आहे, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. शिवसेनेच्या वतीने सामंत यांनी नावेद यांच्या कुटुंबियांना यावेळी 2 लाख रूपयांची मदत केली.