Shivling Shivacharya Maharaj Passes Away: शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर (Shivling Shivacharya Maharaj ) महाराज यांचे यांचे निधन झाले आहे. ते 104 वर्षांचे होते. नांदेड (Nanded) येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अहमदपूर येथे त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.
शिवलिंग शिवाचार्य यांचे लिंगायत समाजात मोठ्या प्रमाणावर भक्त आहेत. स्वातंत्र्य पूर्व काळापासून ते कार्यरत आहेत. कोरोना व्हायरस संसर्गाचा प्रादुर्भाव ध्यानात घेऊन सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सर्व नियम पाळून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. (हेही वाचा - Earthquake In Palghar: पालघर पुन्हा हादरले! आज 3.47 वाजता 2.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप)
शिवलिंग शिवाचार्य महाराज हे समाधी घेणार असल्याची वदंता काही दिवसांपूर्वी पसरली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. महाराजांच्या मठाजवळ मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी उसळली होती. प्रशासनाने अत्यंत संयमाने आणि कायद्याचे पालन करुन भक्तांना पांगवले. त्यानंतर महाराज समाधी घेणार नाहीत, असे सांगण्यात आले.