शरद पवार यांच्या पंतप्रधान होण्याबाबत रामदास आठवले यांचे भाकीत
Sharad Pawar | | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पंतप्रधान होण्याबाबत नेहमीच चर्चा असते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते जाहीर आणि खासगी चर्चा करतानाही त्याबाबत बोलतात. गेली अनेक वर्षे ही चर्चा कायम असताना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (MinisterRamdas Athawale) यांनी मात्र या चर्चेबाबत मोठे विधान केले आहे. काँग्रेस (Congress) जेव्हा सत्तेमध्ये होती तेव्हा, शरद पवार पंतप्रधान होण्याची शक्यता होती. त्या वेळी त्यांचा नंबर लागला असता. पण, त्यावेळी त्यांना बाजूला करण्यात आल्याने त्यांची पंतप्रधान पद मिळवण्याची संधी हुकली. यापुढे मात्र पंतप्रधान पदासाठी त्यांचा कधी नंबर लागेल असे आपल्याला अजिबात वाटत नाही, असे विधान आठवले यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. या वेळी बोलताना आठवले म्हणाले, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर असल्याची चर्चा आहे. या चर्चेशी मी सहमत आहे. ते व्यक्ती म्हणून खूप चांगले आहेत. पण, त्यांनी नेता म्हणून कधीही काम केले नाही. ते पंतप्रधान होण्याआधी आपणच पंतप्रधान व्हायला हव्यात असे मी सोनिया गांधी यांना म्हणालो होतोत. तसेच, जर आपण पंतप्रधान होणार नसाल तर, शरद पवार यांना पंतप्रधान करण्यात यावे, अशी भूमिकाही आपण घेतली होती, अशी आठवण आठवले यांनी या वेळी सांगितली. (हेही वाचा, २०१९मध्ये मोदींची खुर्ची जाणार, माझी भूमिका महत्त्वाची राहणार; शरद पवार यांचे भाकीत)

काँग्रेसला शरद पवार यांना पंतप्रधान करायचं नव्हतं म्हणूनच त्यांना बाजूला करण्यात आले. अचानकपणे मनमोहन सिंह यांचे नाव पुढे करण्यात आले. त्यांच्यावर आदारीत असलेल्या चित्रपटाशी आपण सहमत असल्याचेही आठवले यांनी या वेळी सांगीतले. रामदास आठवले हे एकेकाळी काँग्रेस प्रणित युपीएचे घटक होते. तसेच, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर त्यांनी लोकसभेत खासदार म्हणूनही प्रवेश केला आहे.