Milk Price Agitation | (Photo Credits: | Archived, edited, symbolic images)

राज्यात पुन्हा एकदा दूध दर आंदोलन (Milk Price Agitation) भडकले आहे. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना ( Swabhimani Shetkari Sanghatana) आणि इतरही विविध संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. आक्रमक शेतकऱ्यांनी दूधाची वाहतूक करण्यास विरोध दर्शवला आहे. त्यामुळे काही ठिकाणी आक्रमक आंदोलकांनी दूधाचे टँकर फोडोले आहेत. काही ठिकाणी दुधाच्या गाड्या आडवून दूध रस्त्यवावर ओतले आहे. काही ठिकाणी बैलाला आणि दगडांना दुधाचा अभिषेक घालण्यात आला आहे. दरम्यान, दूध दरबाबत आज एक मंत्रिमंडळ बैठक (Cabinet Meeting) पार पडत आहे. या बैठकीत राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्राप्त माहितीनुसार, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, अकोला आदी जिल्ह्यांमद्ये आज सकाळपासूनच दूध दर वाढ करण्याबाबतच्या मागणीसाठी आंदोलन सुरु झाले आहे. दूध दर वाढ व्हावी. तसेच शेतकऱ्याला गायीच्या दूधासाठी थेट अनूदान मिळावे, दूध पावडर निर्यातीसाठी चालना देण्यात यावे. गायीच्या दूधासाठी 5 रुपये इतके अनुदान असावे अशी मागणी आंदोलकांची आहे. (हेही वाचा, MJPSKY: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वपूर्ण घोषणा)

आंदोलकांचे म्हणने आहे आजघडीला राज्यात दुधाला प्रतिलिटर 16 ते 20 रुपये दर मिळतो. हा दर अत्यल्प आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे हे नुकसान भरुन काढण्यासाठी सरकारने शेतकऱ्याला 5 रुपये इतके अनुदान द्यावे. यासोबतच शिल्लख राहिलेल्या दूधाची पावडर बनवून ती निर्यात करण्यासाठी चालना देण्या यावी, असेही हे आंदोलक सांगतात.