Sanjay Raut On Maharashtra Election: शरद पवार यांच्यानंतर संजय राऊत यांचाही दावा, 'मध्यावधी लागेल, गुजरातसोबतच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक'
Sanjay Raut | (Photo Credit - Twitter)

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर हे सरकार किती काळ टिकेल याबाबत शंका उत्पन्न होऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर राज्यात मध्यवधी लागतील असे आगोदरच म्हटले आहे. आता शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी देखील राज्यात विधानसभेसाठी मध्यवधी ( Mid-term Assembly Elections 2022) लागतील असे म्हटले आहे. राज्यात सत्तांतरानंतर अनेक कायदेशीर पेच निर्माण झाले आहेत. ती लढाई न्यायालयात सुरुच राहिली. परंतू, आम्हीही मध्यवधी लागणार असे संकेत मिळत असल्याने त्या दृष्टीने लढाईसाठी तयारी करत असल्याचे राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी दावा केला आहे की, गुजरात विधानसभा निवडणुकीसोबत महाराष्ट्रातही निवडणुका घेण्याचा भाजपचा विचार आहे. त्यामुळेच भाजपने स्वत:चे 106 आमदार असताना आणि हा पक्ष विधिमंडळातील सर्वात मोठा आहे. तरीसुद्धा या पक्षाने सरकारमध्ये दुय्यम भूमिका घेतली आहे. त्यामुळे गुजरात विधानसभा निवडणुकीपर्यंत सरकार रेटायचे आणि मध्यावधी निवडणुका घ्यायचा असा भाजपचा विचार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

भाजपने आता जे सरकार स्थापन केले आणि ज्यांना मुख्यमंत्री केले, तो निर्णय भाजपने आगोदरच म्हणजे 2019 मध्येच घेतली असती तर महाविकासआघाडी निर्माणच झाली नसती. आज भाजपने शिवसेनेला फोडले आहे. शिवसेनेला फोडणे म्हणजे मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे केल्याप्रमाणेच आहे. भाजपला जर मनातून खरोखरच हे सरकार टीकेल असे वाटत असते तर मुख्यमंत्री भाजपचाच झाला असता, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

राज्यात असंसदीय पद्धीतने राजकीय निर्णय घेण्याची चढाओढच लागली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी घेतलेला निर्णय नवनिर्वाचीत अध्यक्षांनी बदलला आहे. त्यामुळे ही लढाई आता न्यायालयात पोहोचणार आहे. आम्ही ही लढाई मोठ्या सर्व ताकतीने लढू असेही राऊत म्हणाले.