MHADA Pune Lottery 2019 Results Live Streaming:  पुणे, पिंपरी चिंचवड मधील म्हाडा घरांच्या सोडतीच्या निकालांचं लाईव्ह स्ट्रिमिंग इथे पहा लाईव्ह; lottery.mhada.gov.in जाहीर होणार विजेत्यांची यादी
म्हाडा (Photo Credits-Facebook)

MHADA Pune Board Lottery Results:    पुणे, पिंपरी -चिंचवड येथील म्हाडाच्या 2190 घरांच्या लॉटरींसाठी आज (19 नोव्हेंबर) सकाळी 10 वाजल्यापासून सोडतीचा निकाल जाहीर करण्यास सुरूवात झाली आहे. हा निकाल तुम्हांला थेट नेहरू मेमोरिअल हॉल वर जाऊन पहाणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन स्वरूपातही हा निकाल पाहता येणार आहे. यासाठी म्हाडाकडून वेबकास्टिंग सुरू केले आहे. तसेच थोड्याच वेळात आज म्हाडाच्या वेबसाईटवरही निकाल जाहीर करून भाग्यवान विजेत्यांची यादी प्रसिद्ध होणार आहे. तसेच विजेत्या अर्जदारांना SMS च्या माध्यमातून सूचित केले जाणार आहे. MHADA Pune Board Lottery 2019: पुणे, पिंपरी चिंचवड मधील 2190 घरांसाठी सोडत निकाल आज 10 वाजता होणार जाहीर; lottery.mhada.gov.in वर पहा भाग्यवंतांची यादी!

पुणे, पिंपरी, चिंचवड या भागात वन रूम किचन ते 3 बीएचके घरांसाठी ही सोडत आहे. धायरी, धानोरी, खराडी, येवलेवाडी आणि बिबवेवाडी येथील विविध गृहप्रकल्पांमध्ये या सदनिका आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत डुडूळगाव, वाकड, चिखली, मोशी, रावेत, किवळे, पुनवळे, चोवीसवाडी आणि ताथवडे येथील ही घरं आहेत.

म्हाडा पुणे, पिंपरी चिंचवड विभागातील सोडत 2019 निकालाचे वेबकास्टिंग

सामान्यांना स्वस्त दरामध्ये घरं म्हाडाकडून उपलब्ध केली जातात. त्यामुळे अनेकांच्या स्वप्नातील घरं सत्यात उतरवण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने नागरिक अर्ज दाखल करत असतात.