MHADA Lottery Mumbai : सर्वसामान्यांना हक्काचे घर मिळावे म्हणून म्हाडा (MHADA) दरवर्षी घरांची सोडत जाहीर करत असते. या म्हाडा लॉटरीत आमदारांचा 2% कोटा आहे. मात्र म्हाडाने आमदार कोट्यात घट करत कोटा निम्मा केला आहे. त्यामुळे म्हाडा लॉटरीत आमदारांना आता फक्त 1% आरक्षण मिळणार आहे. राहिलेल्या आरक्षणाचा फायदा खेळाडू आणि अनाथांना होणार आहे. त्यामुळे खेळाडू, अनाथ आता घरासाठी अर्ज करता येईल. म्हाडाच्या या निर्णयामुळे खेळाडू, अनाथांना मोठा फायदा होणार आहे. म्हाडाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
म्हाडा सोडतीमध्ये आमदार, खासदार, पत्रकार, माजी सैनिक, अनुसूचित जाती, जमाती यांना स्वतंत्र कोटा दिला जातो. त्यापैकी आमदार कोट्यात घट करण्यात आली आहे. म्हाडा: एक व्यक्ती, एक घर, एक कुटुंब; तब्बल 83 अर्ज
तसंच 16 डिसेंबरला म्हाडाच्या 1,384 घरांसाठी लागलेल्या लॉटरीत म्हाडाने अल्प आणि अत्यल्प गटातील घरांच्या किंमतीही 5% नी कमी केल्या होत्या.