MHADA घरविजेत्यांसाठी खुशखबर; म्हाडाच्या घरांच्या किंमती 5% कमी
16 डिसेंबरला लागलेल्या म्हाडा घरांच्या निकालातील विजेत्यांसाठी एक खुशखबर आहे.
सर्वसामान्यांना घर घेणे शक्य व्हावे म्हणून म्हाडा (MHADA) दरवर्षी घरांची सोडत जाहीर करत असते. यंदाही 16 डिसेंबरला म्हाडाच्या 1,384 घरांसाठी लॉटरीचा निकाल जाहीर झाला. या लॉटरीच्या विजेत्यांसाठी अजून एक आनंदाची बातमी आहे. या लॉटरीतील अल्प आणि अत्यल्प गटातील घरांच्या किंमती 5% नी कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या विजेत्यांना घर स्वस्तात मिळणार असल्याचे म्हाडाने गुरुवारी जाहीर केले. MHADA Vigilance Helpline Number : घराचं आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या एजंटांच्या तक्रारीसाठी खास हेल्पलाईन सुरु
16 डिसेंबरला जाहीर झालेल्या निकालातील विजेत्यांना घराच्या कमी झालेल्या किंमतींचा लाभ मिळणार असल्याचे म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी सांगितले. अल्प आणि अत्यल्प गटातील घरांच्या किंमती जास्त असल्याच्या तक्रारी वारंवार येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पालघर येथील 186 घरांसाठी म्हाडाची पुढील लॉटरी जाहीर होणार आहे. जाणून घ्या म्हाडाची घरे मिळवण्याची नक्की काय आहे प्रक्रिया, कोण होऊ शकते या लॉटरीमध्ये सहभागी
म्हाडाच्या अत्यल्प गटातील घरांच्या किंमती 14-20 लाखांपर्यंत आहेत. तर अल्प गटातील घरांच्या किंमती 20-35 लाखांपर्यंत आहेत. मात्र या नव्या नियमानुसार, या किंमती 5% कमी करण्यात येतील. त्यामुळे अत्यल्प गटातील घरांच्या किंमती 7-10 हजारांनी तर अल्प गटातील घरांच्या किंमती 10-17 हजारांनी कमी होतील.
(The above story first appeared on LatestLY on Dec 21, 2018 02:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

